IMPIMP

Narayan Rane | अधिश बंगल्याबाबत नारायण राणे यांना मोठा दिलासा, जाणून घ्या नेमकं काय झालं

by nagesh
Dasara Melava 2022 | union minister narayan rane said if uddhav thackeray will invite the i will go to dasara melava

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन Narayan Rane | केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा मुंबईत (Mumbai) जुहूमध्ये (Juhu) एक बंगला असुन त्यामध्ये अनधिकृत बांधकाम (Unauthorized Construction) झाल्याची तक्रार राणेंविरोधात करण्यात आली होती. राणेंना 15 दिवसांची मुदत देण्यात आली होती. अशातच नारायण राणे यांना मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) मोठा दिलासा दिला आहे. (Narayan Rane)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

नारायण राणेंनी मुंबई महापालिकेने (BMC) पाठवलेल्या कारवाईच्या आदेशाविरोधात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली, यामध्ये नव्याने कारवाई करण्याची मुभा न्यायालयाने राज्य सरकारला दिली आहे. यावेळी राज्य सरकारकजून महाधिवक्ता कुंभकोणी यांनी उच्च न्यायालयात (Bombay High Court) कारवाईचे आदेश मागे घेत असल्याची माहिती दिली. (Narayan Rane)

 

 

नक्की काय होतं प्रकरणं?
मुंबईतील जुहू येथे नारायण राणेंचा ‘अधिश’ (Adhish) नावाचा बंगला आहे. या बंगल्यामध्ये अनधिकृत बांधकाम झाल्याच्या अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यानंतर राणेंच्या बंगल्याची दोनदा पाहणी करण्यात आली. त्यानंतर राणेंच्या बंगल्यासंदर्भात महापालिकेने नोटीस पाठवली होती. माहिती अधिकारी (Information Officer) संतोष दौंडकर (Santosh Daundkar) यांनी ही तक्रार केली होती.

 

दरम्यान, कोस्टर रेग्युलेशन झोन (Coastal Regulations Zone) नियमांचे उल्लंघन करुन हा बंगला बांधण्यात केल्याची तक्रार त्यांनी केली होती. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राणेंना ही नोटीस पाठवण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र आता न्यायालयानेच नव्याने कारवाई करण्याची मुभा राज्य सरकारला दिली आहे.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Narayan Rane | action order taken back against narayan rane adhish bungalow

 

हे देखील वाचा :

Pune Crime | …म्हणून शाळा सुटताच ‘मॉनिटर’ला बांबू अन् बेल्टने केली बेदम मारहाण; कोंढवा परिसरातील घटना

Alia Bhatt Viral News | लग्नाच्या काही दिवसांपूर्वी आलियानं उचललं टोकाचं पाऊल, तिच्यासोबत झाला मोठा विश्वासघात

LIC Jeevan Saral Pension | ‘या’ योजनेत करा गुंतवणूक अन् निवृत्तीनंतर मिळवा ‘इतकी’ पेन्शन; जाणून घ्या स्कीम

Aadhaar-PAN Link | ‘या’ व्यक्तींसाठी आधार पॅनशी लिंक करण्याची आवश्यकता नाही; जाणून घ्या सविस्तर

 

Related Posts