IMPIMP

Narayan Rane | नारायण राणेंचा उद्धव ठाकरे, संजय राऊतांना टोला; म्हणाले – ‘गप्प बसून आराम करा’

by nagesh
MP Sanjay Raut | shivsena leader sanjay rauts response to bjp leader narayan rane criticism

सिंधुदुर्ग : सरकारसत्ता ऑनलाइन Narayan Rane | भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी शिवसेना पक्षप्रमुख (Shivsena Chief) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena Leader And MP Sanjay Raut) यांच्यावर निशाणा साधला आहे. शिवसेनेच्या आजच्या परिस्थितीला उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) जबाबदार आहेत. आज शिवसेनेचे अस्तित्व संपले असून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पुन्हा उभी राहणार नाही. याला संजय राऊत जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांनी आता गप्प बसून आराम करावा,” असा टोला नारायण राणेंनी लगावला. (BJP Leader And Union Minister Narayan Rane)

 

माध्यमांशी बोलताना नारायण राणे (Narayan Rane) म्हणाले, “उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची मानसिक स्थिती ढासळली आहे.
त्यामुळे आता त्यांनी तोंड बंद करावं, ज्यांना मुख्यमंत्री असताना सुद्धा स्वतःचे आमदार सांभाळता येऊ शकले नाहीत ते मतदार काय सांभाळणार ? महाविकास आघाडी सरकारमध्ये काम करत असताना मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी जनतेचे कुठले प्रश्न सोडवले ? उलट आमच्या कुटुंबीयांना नोटीस बजाविण्याचे काम त्यांनी केले.
अडीच वर्षांत स्वत:च्या आमदार खासदारांना 8-8 तास भेटण्यासाठी प्रतिक्षेत ठेवायचे, त्यांची कामे करायचे नाही.
केवळ मातोश्रीच्या आप्तांचीच कामे करायची हा एक कलमी भ्रष्टाचार त्यांनी केला.”

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

“आपण वेळोवेळी महाविकास आघाडी सरकार कोसळणार हे सांगत होतो. कारण मला आधीच याची कल्पना होती.
आता शिवसेनेच्या चिन्हावरून उभा राहिलेला प्रश्न कायद्याच्या बाबीवर अवलंबून आहे.
येत्या 11 जुलै रोजी होणाऱ्या निर्णयानंतर पुढील हालचाली घडून येतील.
नवीन सरकार जनतेचे विविध प्रश्न सोडवण्याबरोबरच हे राज्य लोक कल्याणकारी राज्य बनावे यासाठी आमचा प्रयत्न राहणार असल्याचं,” नारायण राणे म्हणाले.

 

Web Title :- Narayan Rane | bjp leader narayan rane criticism on former cm uddhav thackeray and shiv sena leaer and mp sanjay raut

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुणे प्रादेशिक परिवहन (RTO) अधिकार्‍याला मागितली 1 कोटी रुपयांची खंडणी; गुन्हा मागे घेण्यासाठी पैसे गोळा करुन देण्याची मागणी, जाणून घ्या प्रकरण

Pune News | शुक्रवार पेठेतील जुन्या वाड्याचा जिना, भिंतीचा काही भाग कोसळला; अग्निशमन दलाने अडकलेल्या 6 रहिवाशांंची केली सुटका

Shivsena MP Sanjay Raut | संजय राऊतांचा बंडखोर आमदारांना टोला; म्हणाले – “तर लगेच त्यांची आमदारकी रद्द होईल, कोर्टातही जावं लागणार नाही”

 

Related Posts