IMPIMP

Nitin Gadkari | ‘मी सरकारमध्ये आहे म्हणून तुम्हाला सांगतोय, सरकारच्या भरवश्यावर राहू नका’, नितीन गडकरींची टोलेबाजी (व्हिडिओ)

by nagesh
Nitin Gadkari | will demand resignation of 10 mps including nitin gadkari agitation again for a separate vidarbha

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाइन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे त्यांच्या मिश्किल स्वभावामुळे परिचित आहेत. अनेक सभा
आणि कार्यक्रमांमध्ये नितीन गडकरींनी भाषणातून जोरदार टोलेबाजी केली आहे. अनेकवेळा त्यांनी आपल्याच पक्षाच्या सरकारचे कान देखील टोचले
आहेत. नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचे भाषणं म्हणजे अशाच खुमासदार टोलेबाजीने भरलेली असतात, हे गणितच झाले आहे. गडकरी यांनी
नागपुरात एका कार्यक्रमात बोलताना केलेल्या टोलेबाजीमुळे उपस्थितांमध्ये हशा पिकला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

नितीन गडकरींनी (Nitin Gadkari) नागपूरमध्ये झालेल्या अ‍ॅग्रो व्हिजन फाऊंडेशनच्या (Agro Vision Foundation) कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात त्यांनी शेतकऱ्यांना (Farmer) उत्पादन (Production) आणि बाजारपेठ (Market) यासंदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी मालासाठी बाजारपेठेचं गणित कसं जुळवून आणायचं, यावर बोलताना केलेल्या टिप्पणीमुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

 

मी ठरवलंय की माझ्या गाडीतून दररोज माल रात्री 10 वाजता भाजी मार्केटमध्ये (Vegetable Market) येईल… 600 किलो, 800 किलो. तो मला 25 रुपयांच्या वर रेट देतो. मला आरामात 30-40 हजार रुपये दोन दिवसाला मिळतात. माझं मार्केट एस्टॅब्लिश झालं. आता मला भाजी विकायला अडचण येत नाही. मी माझं मार्केट स्वत:च शोधलं. तुमचं मार्केट तुम्ही शोधा, असं गडकरी म्हणाले.

 

मी तुम्हाला सांगतो हे सरकार-बिरकार फार भरवशावर राहू नका. मी सरकार म्हणून सांगतो तुम्हाला. अशा उपहासात्मक शब्दांत गडकरींनी यावेळी टोलेबाजी केली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

देवावर अवलंबून राहू नका…
फक्त परमेश्वरावर अवलंबून न राहता स्वत:देखील प्रयत्न करावे लागतात.
यावेळी त्यांनी एक विनोदी उदाहरण दिलं, आपल्याकडे दोन गोष्टी आहेत.
एक तर आपला विश्वास सरकारवर आहे किंवा परमेश्वरावर आहे.
मुलगा झाला तर लगेच लोक म्हणतात, अरे वा, परमेश्वरानं दिला.
आरे बाबा तुझं लग्न झाल्यानंतर तू पुढचा काही कार्यक्रम केला नसता तर मुलगा कसा झाला असता? परमेश्वर आवश्यक आहे.
पण तुझे प्रयत्नही आवश्यक आहेत ना, असे म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.

 

Web Title :- Nitin Gadkari | bjp leader nitin gadkari said do not depend upon government

 

हे देखील वाचा :

NSE Market Turnover | NSE च्या मार्केट टर्नओव्हरमध्ये केवळ दोन शहरांची 80% भागीदारी, SEBI च्या डाटामधून झाला खुलासा

Shinde Government | शिंदे गटाला झटका! सुप्रीम कोर्टाच्या ‘या’ निर्णयामुळे आमदाराची उडणार दांडी

Supreme Court | सरकारसाठी धडा आहे SC चा निर्णय ! 2 वर्षापासून जेलमध्ये बंद असलेल्या पत्रकाराला सोडताना काय-काय म्हटले, जाणून घ्या

Governor Appointed MLA | राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीवरुन मविआ आणि शिंदे सरकारमध्ये राडा, वाद पोहोचला उच्च न्यायालयात

 

Related Posts