IMPIMP

NSE Market Turnover | NSE च्या मार्केट टर्नओव्हरमध्ये केवळ दोन शहरांची 80% भागीदारी, SEBI च्या डाटामधून झाला खुलासा

by nagesh
NSE Market Turnover | nse s market turnover just two cities contribute 80 percent as per sebi data

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – NSE Market Turnover | मागील दोन दिवसांपासून स्टॉक मार्केट (stock market) संबंधी एक डाटा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेयर होत आहे. याच्यानुसार, देशात पहिल्यांदा डिमॅट अकाऊंट (demat accounts) ची एकुण संख्या 10 कोटीच्या आकड्याच्या पुढे गेली आहे (NSE market turnover).

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

इतके की अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनीही ट्विटरवर याबाबत उल्लेख केला आहे, शिवाय असेही सांगितले आहे की, मागील दोन वर्षांदरम्यान डिमॅट खात्यांच्या संख्येच्या वाढीत जास्त भागीदारी 2 टियर आणि 3 टियर शहरांची होती.

 

मुंबई आणि अहमदाबादचा दबदबा
जरी हे सत्य असले की, देशातील प्रत्येक भागातील इन्व्हेस्टर्सची बाजारात भागीदारी वाढत आहे, परंतु भारतात बहुतांश म्हणजे जवळपास 80 टक्के ट्रेडिंग केवळ दोन शहरांमधून मुंबई आणि अहमदाबादमधून होत आहे. (NSE Market Turnover)

 

सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाकडून मिळालेल्या डाटावरून समजते की, चालू आर्थिक वर्षात जुलैपर्यंत मुंबई आणि अहमदाबादचे नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) च्या एकुण कॅश मार्केटच्या टर्नओव्हरमध्ये अनुक्रमे 67.8 टक्के आणि 11.4 टक्के योगदान होते.

 

या आकड्यांचे महत्व यासाठी सुद्धा आहे, कारण कोणतेही इतर शहर क्वचितच एक्सचेंजच्या मार्केट टर्नओव्हरमध्ये या शहरांच्या जवळपास योगदान करत असेल.

बीएसईवर काय स्थिती
BSE वर या दोन शहरांचे याच कालावधीमध्ये कॅश मार्केटमध्ये 58 टक्के योगदान होते.
मुंबईच्या जास्त भागीदारीचे कारण हे सुद्धा आहे की, बहुतांश इन्स्टीट्यूशनल इन्व्हेस्टर्स, फॉरेन पोर्टफोलियो इन्व्हेस्टर्स,
इन्श्युरन्स कंपन्या, फायनान्शियल इन्स्टीट्यूशन, बँका इत्यादींची ऑफिस आर्थिक राजधानीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

इतर मेट्रो शहरांची काय आहे स्थिती
इतके की दिल्ली (4.6 टक्के), चेन्नई (50.1 टक्के) आणि कोलकाता (0.9 टक्के) सारख्या मेट्रो शहरांसोबतच
बेंगळुरू (0.7 टक्के) आणि हैद्राबाद (2.4 टक्के) सारख्या आयटी हबची भारतीय स्टॉक मार्केटच्या कॅश सेगमेंटमध्ये किरकोळ भागीदारी आहे.

 

विशेष म्हणजे मागील दोन वर्षात Zerodha, Upstock, Grow आणि 5 Paisa सारख्या डिस्काऊंट
ब्रोकिंग कंपन्यांद्वारे मार्केटमध्ये मोठ्या संख्येत तरूण उतरले आहेत.

 

Web Title :- NSE Market Turnover | nse s market turnover just two cities contribute 80 percent as per sebi data

 

हे देखील वाचा :

Shinde Government | शिंदे गटाला झटका! सुप्रीम कोर्टाच्या ‘या’ निर्णयामुळे आमदाराची उडणार दांडी

Supreme Court | सरकारसाठी धडा आहे SC चा निर्णय ! 2 वर्षापासून जेलमध्ये बंद असलेल्या पत्रकाराला सोडताना काय-काय म्हटले, जाणून घ्या

Governor Appointed MLA | राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीवरुन मविआ आणि शिंदे सरकारमध्ये राडा, वाद पोहोचला उच्च न्यायालयात

 

Related Posts