IMPIMP

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 47 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pimpri Corona Update | Pimpri Chinchwad's journey towards Corona free city, find out other statistics

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइन पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Corona) कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. शहरामध्ये नव्याने आढळून येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. तर बरे होणाऱ्या रुग्णांचे (Recover patient) प्रमाण कमी जास्त आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona) 49 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 01 रुग्णांच्या मृत्यूची नोंद (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) झाली आहे. गेल्या 24 तासात शहरामध्ये एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 6573 संशयितांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 49 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 78 हजार 132 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 47 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 74 हजार 007 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. (Pimpri Corona)

शहरामध्ये सध्या 339 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शहरामध्ये मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे. यापूर्वी मृत्यू झालेल्या शहराबाहेरील एका रुग्णाची नोंद आज करण्यात आली आहे. गेल्या 24 तासात एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4517 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

दिवसभरात 11,955 जणांचे लसीकरण
बुधवार (दि.15) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे. तर 132 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले. आज दिवसभरात 11 हजार 955 जणांना लस देण्यात आली आहे. आजपर्यंत शहारमध्ये 28 लाख 21 हजार 601 जणांना लस देण्यात आली आहे.

 

Web Title :- Pimpri Corona | Discharge of 47 patients of Corona in Pimpri Chinchwad, find out other statistics

 

हे देखील वाचा :

Nana Patekar On Thackeray Government | सुप्रसिध्द अभिनेते नाना पाटेकरांची ठाकरे सरकारवर टीका, म्हणाले – ‘…उध्दवा अजब तुझे सरकार’

Gold-Silver Price Today | खुशखबर ! खरेदीसाठी त्वरा करा; सोने-चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या आजचे दर

Pune Crime | राजगुरुनगर येथे भरदिवसा पिकमधून पावणेतीन लाखांची रोकड लंपास, परिसरात खळबळ

 

Related Posts