IMPIMP

PM Kisan चा 10 वा हप्ता येणार आहे खात्यात, परंतु अगोदर तपासा आपले KYC; जाणून घ्या

by nagesh
PM Kisan Samman Nidhi Yojana | pm kisan samman nidhi social audit to start from may pm kisan nidhi 11th instalment

नवी दिल्ली : वृत्तसंस्था PM Kisan योजनेच्या 10व्या हप्त्याची घोषणा लवकरच होण्याची अपेक्षा आहे. मागील वर्षी डिसेंबरमध्ये सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 7वा हप्ता दिला होता आणि त्यानंतर दोन वेळा हप्ता जारी करण्यात आला. आता 10 व्या हप्त्याचा नंबर आहे. मात्र सरकारकडून सध्या कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही परंतु या महिन्यात तो येऊ शकतो. (PM Kisan)

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

पीएम-किसानच्या वेबसाईटनुसार या योजनेत शेतकर्‍यांना 6000 रुपये दरवर्षी दिले जातात. ही रक्कम दर चार महिन्यात 2000 रुपयांच्या तीन समान हप्त्यात मिळते. परंतु यासाठी आवश्यक आहे की तुमचे आधार कार्ड पीएम-किसान खात्याशी लिंक असावे. तसे नसल्यास रक्कम खात्यात येणार नाही. म्हणजे तुम्हाला KYC अपडेट करावे लागेल.

 

आधारसोबत असे लिंक करा PM किसान खाते

1. यासाठी प्रथम https://pmkisan.gov.in/ पोर्टल वर जा.

2. उजव्या कोपर्‍यात सर्वात वर eKYC लिहिले आहे त्यावर क्लिक करा.

3. आता आधार नंबर आणि इमेज कोड टाकून सर्च बटनवर क्लिक करा.

4. नंतर आधारसोबत लिंक मोबाईल नंबर टाका आणि ओटीपी टाका.

5. सर्व ठिक असेल तर eKYC पूर्ण होईल अन्यथा Invalid लिहून येईल.

6. जर प्रक्रिया इनव्हॅलिड झाली तर आधार सेवा केंद्रावर जाऊन हे ठिक करा.

असे तपासा हप्त्याचे स्टेटस :
PM Kisan वेबसाईट pmkisan.gov.in वर जाऊन. होम पेजवर मेन्यू बार पहा आणि येथे फार्मर कार्नर (Farmers Corner) वर जा. येथे बेनिफिसरी स्टेटस (Beneficiary Status) वर क्लिक करा. आता या पेजवर तुमच्या अर्जाचे स्टेटस जाणून घेण्यासाठी 3 पर्याय दिसतील. आधार नंबर, अकाऊंट नंबर आणि मोबाईल नंबर, यापैकी एक पर्याय निवडा. जो पर्याय निवडला आहे, त्यामध्ये तो नंबर टाका. तो नंबर टाकून गेट डाटा वर क्लिक करा. आता तुम्हाला स्टेटस दिसेल.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

1.58 लाख कोटी रुपये पाठवले
आतापर्यंत सरकारने देशातील 11.37 कोटीपेक्षा जास्त शेतकर्‍यांच्या खात्यात थेट 1.58 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त ट्रान्सफर केले आहेत. आतापर्यंत शेतकर्‍यांच्या खात्यात 9 हप्त्यात पैसे पाठवण्यात आले आहेत.

 

Web Title :- PM Kisan | pm kisan 10th instalment pm kisan beneficiaries list know pm kisan samman nidhi scheme status and other key points

 

हे देखील वाचा :

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 47 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Nana Patekar On Thackeray Government | सुप्रसिध्द अभिनेते नाना पाटेकरांची ठाकरे सरकारवर टीका, म्हणाले – ‘…उध्दवा अजब तुझे सरकार’

Gold-Silver Price Today | खुशखबर ! खरेदीसाठी त्वरा करा; सोने-चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या आजचे दर

 

Related Posts