IMPIMP

Presidential Election | द्रौपदी मुर्मू यांचा विजय, राष्ट्रपतीपदावर पहिल्या आदिवासी महिला विराजमान

by nagesh
Presidential Election | presidential election results 2022 nda droupadi murmu won in presidential polls

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Presidential Election | राष्ट्रपती निवडणुकीत भाजपप्रणित (BJP) राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांचा विजय झाला आहे. यूपीएचे (UPA) उमेदवार यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांचा या निवडणुकीत (Presidential Election) पराभव झाला आहे. मतमोजणी आधीच द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित मानला जात होता. कारण भाजपने या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांना विजय मिळावा यासाठी प्रचंड मोर्चेबांधणी केली होती.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

राष्ट्रपतीपदावर विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या आदिवासी महिला (Tribal women) असतील. द्रौपदी मुर्मू या 25 जुलै रोजी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतील. देशाचे सध्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ram Nath Kovind) यांचा कार्यकाल 24 जुलै रोजी समाप्त होत आहे.

 

 

 

मतमोजणीच्या पहिल्या फेरीत एनडीएच्या द्रौपदी मुर्मू यांना 540 मतं मिळाली होती. या मताचे मुल्य 3,78,000 इतकं होतं. तर विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना 208 मंत मिळाली होती. त्यांच्या मतांचे मुल्य 1,45,600 इतकं होतं. दुसऱ्या फेरीत द्रौपदी मुर्मू यांना 1349 मतं मिळाली त्याचं मूल्य 4,83,299 इतकं आहे. तर यशवंत सिन्हा यांना 537 मतं मिळाली. त्यांच्या मतांची मूल्य 1,79,876 इतकं आहे.

 

राष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी (Presidential Election) 18 जुलै रोजी मतदान घेण्यात आलं होतं.
या निवडणुकीचा निकाल आज जाहीर करण्यात आला. त्यानुसार आज मतमोजणी पार पडली.
या मतमोजणीत द्रौपदी मुर्मू यांचा विजय झाला. द्रौपदी मुर्मू विजयानंतर आता 25 जुलैला राष्ट्रपतीपदाची शपथ घेतील.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Presidential Election | presidential election results 2022 nda droupadi murmu won in presidential polls

 

हे देखील वाचा :

Share Market | लागोपाठ 5 व्या दिवशी तेजीत बंद झाला बाजार, सेन्सेक्स 284 अंकानी वाढला

Shivsena | शिवसेना व युवासेनेची लवकरच पुणे शहर कार्यकारणी जाहीर करणार – प्रमोद नाना भानगिरे

Aditya Thackeray | ‘खाऊन खाऊन अपचन झालेले गेले, लाज शिल्लक असेल तर…, – आदित्य ठाकरे (व्हिडीओ)

 

Related Posts