IMPIMP

Pune Police Inspector Transfers | लोणी काळभोर आणि विमानतळ पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सेवानिवृत्त, ‘या’ 2 वरिष्ठ निरीक्षकांकडे दिला अतिरिक्त कार्यभार

वरिष्ठ पोलिस निरीक्षक डी.एल. चव्हाण आणि विलास सोंडे सेवानिवृत्त

by sachinsitapure
Pune Police Inspector Transfers

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Police Inspector Transfers | लोणी काळभोर पोलिस स्टेशन (Loni Kalbhor Police Station) आणि विमानतळ पोलिस स्टेशनमध्ये (Viman Nagar Police Station) कार्यरत असलेले वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनुक्रमे दत्तात्रय लक्ष्मणराव चव्हाण (Sr PI DL Chavan) आणि विलास तुळशीराम सोंडे (Sr PI Vilas Sonde) हे आज (दि. 31 ऑक्टोबर 2023) सेवानिवृत्त झाले. त्यामुळे लोणी काळभोर आणि विमानतळ पोलिस स्टेशनचा अतिरिक्त पदभार इतर वरिष्ठ पोलिस निरीक्षकांकडे देण्यात आला आहे. (Pune Police Inspector Transfers)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

पुणे शहर पोलिस दलातील गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलिस निरीक्षक आनंदराव तुकाराम खोबरे (Sr PI Anandrao Khobre) यांना विमानतळ पोलिस स्टेशनचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे तर नियंत्रण कक्षात वरिष्ठ पोलिस निरीक्षक असलेले दशरथ शिवाजी पाटील (Sr PI Dashrath Patil) यांच्याकडे लोणी काळभोर पोलिस स्टेशनचा पदभार देण्यात आला आहे.

याबाबतचा आदेश पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी आज काढला आहे.

Related Posts