IMPIMP

Raju Waghmare | धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न; काँग्रेस नेते राजू वाघमारे यांचा भाजपवर आरोप

by nagesh
Raju Waghmare | congress leader raju waghmare criticized bjp after illegal construction near afzal khan memorial is being demolished at pratapgarh

सातारा : सरकारसत्ता ऑनलाईन  प्रतापगडावर (Pratapgad) असलेल्या अफझल खानाच्या (Afzal Khan) कबरीजवळील अनधिकृत बांधकाम (Illegal Contruction) हटवण्यास सकाळी सुरूवात झाली. या कबरीवरून काँग्रेस प्रवक्ते (Congress Spokeperson) राजू वाघमारे (Raju Waghmare) यांनी भाजपावर (BJP) सडकून टीका केली आहे. “अफझलखानाचं नाव घेत धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. मुलभूत समस्यांपासून लोकांचं लक्ष भरकटवण्यासाठी या कुरापती भाजप करत आहे”, असा आरोप राजू वाघमारे (Raju Waghmare) यांनी केला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अफजलखानाच्या कबरी शेजारी उदात्तीकरण करण्यासाठी वनविभागाच्या (Forest Department) जागेत अनेक खोल्यांचे अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते.
ते पाडून टाकण्याची मागणी अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी (Hindu Organisation) केली होती, तसेच न्यायालयानेही हे बांधकाम पाडण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार साताऱ्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी (Collector Ruchesh Jayavanshi),
पोलीस अधिक्षक समीर शेख (Superintendent of Police Sameer Sheikh),
वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव (Rajendra Jadhav) यांच्या देखरेखीत हे अनधिकृत बांधकाम पाडण्याचे काम चालू आहे.

 

‘अनधिकृत बांधकामं पाडलीच पाहिजेत, पण हा प्रकार धर्माच्या नावावर सुरू असेल,
तर भापजने हा खेळ थांबवावा’, असे आवाहन वाघमारे यांनी केले आहे.
निवडणुका जवळ आल्याने धर्मांमध्ये द्वेष पसरवण्याचे काम शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) करत
असल्याचा आरोपही राजू वाघमारे (Raju Waghmare) यांनी केला आहे.

 

Web Title :- Raju Waghmare | congress leader raju waghmare criticized bjp after illegal construction near afzal khan memorial is being demolished at pratapgarh

 

हे देखील वाचा :

Devendra fadanvis | ‘ते काम कोणता एक पक्ष करू शकत नाही’, राऊतांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

Sharad Ponkshe | ‘हर हर महादेव’च्या समर्थनात शरद पोंक्षे म्हणले, ‘तुम्ही गुंड आहात का? हा शुद्ध हलकटपणा…’

Sharad Pawar | भाजपने निवडलेल्या कुस्तीगीर परिषदेला मोठा झटका; शरद पवारांची परिषद भरवणार महाराष्ट्र केसरी आखाडा

 

Related Posts