IMPIMP

Rajya Sabha Election 2022 | ‘महाविकास आघाडीत मतभेद नाहीत, चारही उमेदवार विजयी होणार’; संजय राऊत यांचं स्पष्टीकरण

by nagesh
Sanjay Raut | 'BJP's use of Veer Savarkar only for vote politics' - Sanjay Raut

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Rajya Sabha Election 2022 | विरोधी पक्षाकडून चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) कोणतेही मतभेद नाहीत. राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Election 2022) आमचे चारही उमेदवार विजयी होतील,’ असा विश्वास शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केला.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

राज्यसभेसाठी आज मतदान होणार आहे. भाजप (BJP) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार मतदानासाठी विधानभवनात दाखल झाले आहेत. मतदानानंतर सर्वांना हे आकडे दिसणार असल्याचे सांगत राऊत म्हणाले की, “निवडणुकीपूर्वी चुरस होणार असे वातावरण निर्माण करण्यात आले होते. मात्र हे चुकीचे आहे. महाविकास आघाडीला 169 आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे चारही उमेदवार विजयी होणार हे नक्की आहे. यामध्ये शिवसेनेचे दोन, काँग्रेस एक आणि राष्ट्रवादीच्या एका उमेदवाराचा समावेश आहे.”

 

दरम्यान, राज्यसभा निवडणुकीच्या मतदानासाठी काही तास शिल्लक असताना शरद पवार (Sharad Pawar) यांनी महाविकास आघाडीच्या रणनीतीत मोठा बदल केला.
त्यांनी ऐनवेळी मताचा कोटा 42 वरून वाढवून 44 केला आहे. यामुळे शिवसेना नाराज झाल्याची चर्चा सुरू झाली होती.
मात्र आमच्यात कोणतेही मतभेद नसल्याचे सांगत राऊत यांनी यावर पडदा टाकला.

 

राज्यसभेच्या 6 जागांसाठी आज मतदान –

राज्यसभेच्या 6 जागांसाठी 6 उमेदवार रिंगणात आहेत. आज सकाळपासून मतदानास सुरुवात झाली आहे.
मतदान प्रक्रिया 4 वाजेपर्यंत सुरू राहील. त्यानंतर मतमोजणी होणार आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी मतदान करता यावे यासाठी ईडीच्या विशेष न्यायालयात (Special Court of ED) अर्ज दाखल केला होता.
पण त्यांना अजून परवानगी देण्यात आली नाही. दोघांनाही घटनेने मतदानाचा अधिकार दिला आहे.
पण तरीही त्यांना तो मिळत नसल्याचा आरोपही राऊत यांनी शेवटी केला.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Rajya Sabha Election 2022 | all the four candidates of mahavikas aghadi will win says shivsena leader and mp sanjay raut

 

हे देखील वाचा :

Rajya Sabha Election 2022 | गंभीर आजारी असणारे भाजप आमदार रुग्णवाहिकेतून विधान भवनात दाखल; म्हणाले – ‘पक्षाला आज माझी गरज’

Rajya Sabha Election 2022 | पहिल्या पसंतीची सर्वाधिक मते कोण मिळविणार यावर ठरणार 6 व्या उमेदवाराचे भवितव्य; जाणून घ्या राज्यसभेसाठी कशी होते मतमोजणी

Rajya Sabha Election 2022 | ‘महाविकास आघाडीतला एक ‘संजय’ जाणार’ – भाजपा नेत्याचं मोठं विधान

 

Related Posts