IMPIMP

Rajya Sabha Election 2022 | पहिल्या पसंतीची सर्वाधिक मते कोण मिळविणार यावर ठरणार 6 व्या उमेदवाराचे भवितव्य; जाणून घ्या राज्यसभेसाठी कशी होते मतमोजणी

by nagesh
Rajya Sabha Election Results | BJP's plan success! Dhananjay Mahadik's victory in sixth place; Shiv Sena's Sanjay Pawar defeated

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनRajya Sabha Election 2022 | राज्यसभेसाठी आज विधानभवनात मतदान सुरु असून त्यात पहिल्या पसंतीची ४२ मते मिळविणारा उमेदवार हा विजय होणार आहे. मात्र, सात उमेदवार रिंगणात असल्याने ही निवडणुक होणार आहे. या निवडणुकीत पसंतीच्या क्रमांकानुसार मतमोजणी होणार असल्याचे त्यात आपल्या उमेदवारांना कोटा ठरवून देताना ज्यांची रणनिती भक्कमपणे कार्यन्वित होईल. त्यांचा सहावा उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे. (Rajya Sabha Election 2022)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

अशी होते मतमोजणी
राज्यसभेसाठी मतदान संपल्यानंतर सायंकाळी मतमोजणी सुरु होणार आहे. विधानसभेचे सध्या २८७ आमदार आहेत. प्रत्येक मताचे मुल्य शंभर इतके ठरविण्यात आले आहे. त्यानुसार एकूण मुल्य २८ हजार ७०० इतके आहे. त्यात एक मिसळून त्याला जितक्या जागा त्याने भागायचे जो भागाकार येईल, त्यात १ मिसळायचा. त्यानुसार पहिल्या पसंतीचे किमान ४१०१ मते मिळतील तो उमेदवार विजयी म्हणून घोषित केला जाईल. आता त्यात गोम अशी की पहिल्या फेरीत जास्तीतजास्त ५ उमेदवार ४१०१ मते मिळवून विजयी होऊ शकतात. त्यामुळे सहाव्या उमेदवाराच्या विजयासाठी सर्वाधिक मते मिळवून विजयी झालेल्या उमेदवाराला मिळालेल्या दुसर्‍या उमेदवाराची मतांची मोजणी केली जाते. मात्र, त्यांचे मुल्य हे पहिल्या पसंतीच्या मुल्याइतके नसून ते त्यापेक्षा कमी असते. इथेच सत्ताधारी आणि विरोधकांची खरी कसोटी लागणार आहे. (Rajya Sabha Election 2022 )

 

कोणत्या पक्षाचे उमेदवार सर्वाधिक मते मिळवून पहिल्या पसंतीने विजयी होतील व त्यांनी दुसर्‍या पसंतीची मते कशी दिली, यावर हा सर्व खेळ रंगणार आहे. त्यामुळे आपल्या उमेदवारावर ४२ पेक्षा अधिक मते देऊन सर्वाधिक मतांनी अगोदर दोघांना निवडून आणायचे व त्यांच्या दुसर्‍या क्रमांकाच्या मताच्या जोरावर उरलेला उमेदवार निवडून आणायचा अशी खेळी सत्ताधारी व विरोधक करताना दिसत आहे.

 

अशी होते दुसर्‍या क्रमांकाची मोजणी

समजा, उमेदवारांना पहिल्या पसंतीची मते ५२, ४४, आणि ४० अशी मिळाली असे आपण गृहीत धरले.
तर त्यात ५२ व ४४ मते मिळविणारे उमेदवार विजयी होतील.
त्यानंतर शेवटच्या उमेदवाराच्या विजयासाठी पहिल्या ५२ मते मिळवून विजयी झालेल्या उमेदवाराची दुसर्‍या क्रमांकाची मते कोणाला मिळाली, याची मोजणी होते.
मात्र, यावेळी त्याच्या मतांचे मुल्य कमी झाले असते. एकूण मतांची कोटा ४१०१ असल्याने या उमेदवाराला मिळालेली १०९९ अतिरिक्त मते त्यांना ५२ ने भागले की आले २१.१३ म्हणजे पहिल्या क्रमांकाच्या मताचे मुल्य १०० असले तरी आता दुसर्‍या क्रमांकाच्या मताचे मुल्य हे २१़.१३ इतके असणार आहे.
आता दुसर्‍या क्रमांकाची मते कोणाला मिळाली. ते मोजले जाते.
त्यातूनही सर्व ६ जागांच्या उमेदवारांना अपेक्षित मताचा कोटा पूर्ण करता आला नाही तर, पहिल्या पसंतीची दुसरी मते मिळविणार्‍या विजयी उमेदवाराची दुसर्‍या पसंतीची मते मोजली जातात.
तरीही कोटा पूर्ण झाला नाही तर तिसर्‍या विजयी उमेदवाराची मते मोजली जातात.
अशा प्रकारे जो उमेदवार कोटा पूर्ण करेल, तो विजयी होतो.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

त्यामुळे सर्वाधिक मतांनी कोणाचे उमेदवार विजयी होतात व कोणाच्या उमेदवारांची दुसर्‍या पसंतीची मते अगोदर मोजली जातात.
यावर सर्व गणिते अवलंबून आहेत. हे गणित आखून त्याची काटेकोर अंमलबजावणी ज्यांकडून होईल, त्यांच्याकडे सहावी जागा जाण्याची शक्यता आहे.

 

Web Title :- Rajya Sabha Election 2022 | The fate of the 6th candidate will depend on who gets the most votes of the first choice Learn how counting of votes for Rajya Sabha is done

 

हे देखील वाचा :

Rajya Sabha Election 2022 | ‘महाविकास आघाडीतला एक ‘संजय’ जाणार’ – भाजपा नेत्याचं मोठं विधान

Gold Silver Price Today | सोन्यात तेजी तर चांदीच्या किंमतीत घसरण; जाणून घ्या आजचे दर

Bombay High Court-Nagpur Bench | ‘प्रेमसंबंध तोडणे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे’ – उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

 

Related Posts