IMPIMP

Shivsena | ‘उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे ब्रँड खोक्याने विकत घेता येणार नाही’

by nagesh
Maharashtra Politics News | minister deepak kesarkar targeted uddhav thackeray aditya thackeray

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन निवडणूक आयोगाने (Election Commission of India) धनुष्यबाण (Dhanushyaban Symbol) चिन्ह गोठवल्यानंतर शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) समर्थक आणि शिंदे गट (Shinde Group) यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. शिंदे गटामुळे हे चिन्ह गोठवण्यात आले असल्याचे उद्धव ठाकरे समर्थकांकडून सांगण्यात येत आहे. तर चिन्ह गोठवण्याला उद्धव ठाकरे जबाबदार असल्याचा आरोप शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. आयोगाच्या निर्णयामुळे अंधेरी पोटनिवडणुकीत (Andheri By-Election) शिवसेनेला (Shivsena) धनुष्यबाण चिन्ह वापरता येणार नाही. त्यामुळे ठाकरे गटाला (Thackeray Group) ही निवडणूक कठीण होऊ शकते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

यावरुन शिवसेनेचे (Shivsena) खासदार विनायक राऊत (MP Vinayak Raut) यांनी शिंदे गटावर टीका केली आहे. कितीही प्रयत्न केले तरी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हा ब्रँड पुसू शकत नाही किंवा खोक्याने विकत घेता येणार नाही, असे म्हटले. सोमवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress State President Nana Patole), भाई जगताप (Bhai Jagtap), आणि अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली

 

या भेटीनंतर विनायक राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधाला. ते म्हणाले, या भेटीमध्ये नाना पटोले, भाई जगताप, आणि अमित देशमुख यांनी अंधेरी पोटनिवडणुकीसाठी पूर्ण सहकार्य करण्याचा शब्द दिला आहे. तसेच समोरच्या मणसांनी कितीही प्रयत्न केले तरी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हा ब्रँड पुसू शकत नाही किंवा खोक्याने विकत घेता येणार नाही, असेही राऊत म्हणाले. याशिवाय सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) युक्तिवाद सुरु असून न्यायाचा विजय होईल, अशी अपेक्षा असल्याचेही त्यांनी म्हटले.

 

दरम्यान, संजय राऊत (Sanjay Raut) यांचे बंधू सुनील राऊत (Sunil Raut) यांनी देखील शिंदे गटावर टीका केली आहे.
सुनील राऊत म्हणाले, शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर शिंदे गटाविरोधात एक संतापाची लाट उसळू लागली आहे.
ही लाट येणाऱ्या निवडणुकीत मतपत्रिकेत उतरेल आणि शिंदे गट संपुष्टात येईल, अशा प्रकारचे वातावरण या राज्यात आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Shivsena | uddhav thackeray aditya thackeray cant erase the brand vinayak raut criticism of shinde group

 

हे देखील वाचा :

Pune Water Supply | गुरुवारी पुणे शहरातील काही भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार

Uddhav Thackeray | राष्ट्रीय पातळीवर पोहचण्यासाठी शिवसेनेचा नवा प्लॅन? उद्धव ठाकरे भिडणार थेट नरेंद्र मोदींना?

Aurangabad Crime | चालत्या बसमधून डोके बाहेर काढणे बेतलं जिवावर, नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

 

Related Posts