IMPIMP

Tulja Bhavani Temple News | भाविकांच्या संतापानंतर तुळजाभवानी मंदिर देवस्थानचा ड्रेस कोडवरून यु टर्न; निर्बंध घातले नसल्याचे स्पष्टीकरण

by nagesh
Tulja Bhavani Temple News | Tuljabhavani Temple Devotion U-turns on Dress Code After Devotee Rage; Clarification that no restrictions have been imposed

तुळजापूर : सरकारसत्ता ऑनलाईन – (Devotees) Tulja Bhavani Temple News | महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात दर्शनासाठी भागाऱ्यात जाण्यासाठी लागू करण्यात आलेल्या ड्रेसकोडचा (Dress Code) निर्णय मागे घेण्यात आला आहे. गुरुवारी सकाळीच तुळजाभवानी मंदिर (Tulja Bhavani Temple News)प्रवेशासाठी मंदिर संस्थानच्या वतीने एक नियमावली जारी करण्यात आली होती. याबाबतचा निर्णय घेतल्यानंतर तुळजाभवानी मंदिर संस्थानने (Tulja Bhavani Mandir Sansthan Tuljapur) मंदिर परिसरात याबाबतचे फलक लावले होते. त्यावरुन मोठा गदारोळ झाला होता. अखेर तुळजाभवानी मंदीर संस्थानने या निर्णयावरुन यु टर्न घेतला आहे.

तुळजाभवानी मंदीर संस्थानचे तहसीलदार सौदागर तांदळे (Tehsildar Saudagar Tandale) यांनी याबाबत
परिपत्रक जारी केले आहे. तुळजाभवानी मंदिरामध्ये पूजेसाठी अथवा दर्शनासाठी आलेल्या कोणत्याही भाविकांना
कोणतेही निर्बंध घालण्यात आले नसल्याचे स्पष्टीकरण या परिपत्रकात देण्यात आले आहे.
अंगप्रदर्शन, उत्तेजक, असभ्य अशोभनिय वस्त्रधारी, हाफ पॅन्ट, बर्मुडाधारकांना मंदिरात प्रवेश नाही,
असे फलक लावण्यात आले होते. मात्र आता त्याबाबतचा निर्णय मागे घेण्यात आला आहे.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

सध्या लग्नसराई सुरू असल्याने तुळजापूरला देवीचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे.
त्यातच शाळेला उन्हाळी सुट्ट्या असल्याने पर्यटन आणि देवदर्शन यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात तुळजापूरला
येत आहे. मात्र ड्रेसकोड संदर्भात कोणतीही पूर्वसूचना न देता गुरुवारी मंदिर परिसरात अचानक फलक लावण्यात आले.
यामुळे महाराष्ट्रासह इतर राज्यातून आलेल्या भाविकांची गैरसोय झाली.

Web Title : Tulja Bhavani Temple News | Tuljabhavani Temple Devotion U-turns on Dress Code After
Devotee Rage; Clarification that no restrictions have been imposed

Related Posts