IMPIMP

Udayanraje Bhosale On Sanjay Raut | संजय राऊतांचं नाव घेताच उदयनराजे कडाडले; म्हणाले – ‘संजय राऊत कोण, मला माहित नाही’

by nagesh
Udayanraje Bhosale On Sanjay Raut | rajya sabha election 2022 mp udayanraje bhosale criticizes shivsena leader and mp sanjay raut

सातारा : सरकारसत्ता ऑनलाइन Udayanraje Bhosale On Sanjay Raut | राज्यात राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Elections 2022) 6 व्या जागेवरून शिवसेना (Shivsena) आणि भाजपमध्ये (BJP) थेट लढत आहे. शिवसेना आणि भाजपनं ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. आज सहाव्या जागेवरचा कुणाचा उमेदवार निवडून येणार याबाबत सर्व चित्र संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल. तर दुसरीकडे शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये एकमेकांवर आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहे. (Udayanraje Bhosale On Sanjay Raut)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

गेल्या काही दिवसात माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीवरून साताऱ्याचे भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (MLA Shivendrasinharaje Bhosale) यांच्यावर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टीका केली होती. आता याच टीकेवर भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. साताऱ्यात उदयनराजे भोसले एका कार्यक्रमाला उपस्थित होते, त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

संजय राऊतांच्या टीकेवर सवाल केला असता. त्यावेळी उदयनराजे म्हणाले की, “संजय राऊत कोण मला माहित नाही.
आम्ही कुणाबद्दल वाईट बोलत नाही. पण, आमच्याबद्दल जर कोणी वाईट बोललं तर आम्ही बांगड्या घातल्या नाहीत.
प्रत्येकाला आपल्या घराण्याचा स्वाभिमान आहे. त्यामुळं कोणी शांत बसणार नाही. बाकी काही पेटलं तरी चालेल बघतोच,” असा थेट इशाराच उदयनराजेंनी दिला आहे.

 

दरम्यान, “संभाजीराजे यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीचा विषय हा छत्रपती संभाजीराजे आणि शिवसेनेतला आहे.
इतरांनी त्यामध्ये चोमडेपणा करू नये. भाजपला इतकंच वाटत होतं तर त्यांनी संभाजीराजे यांना 42 मतं द्यायला पाहिजे होती.’
असंं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. त्या विधानानंतर आता उदयनराजेंनी राऊतांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Udayanraje Bhosale On Sanjay Raut | rajya sabha election 2022 mp udayanraje bhosale criticizes shivsena leader and mp sanjay raut

 

हे देखील वाचा :

Rajya Sabha Elections 2022 | कर्करोगाशी झुंज देणाऱ्या भाजप आमदार मुक्ता टिळक मतदानासाठी रुग्णवाहिकेतून विधानभवनात

Rajya Sabha Elections 2022 | राज्यसभा निवडणूक ! 6 जागांसाठी 7 उमेदवार रिंगणात, आज फैसला

Rajya Sabha Election 2022 | ‘महाविकास आघाडीत मतभेद नाहीत, चारही उमेदवार विजयी होणार’; संजय राऊत यांचं स्पष्टीकरण

 

Related Posts