IMPIMP

Uddhav Thackeray | लवकरच संपणार उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख पदाची मुदत; कोण असणार ठाकरे गटाचा पुढचा पक्षप्रमुख?

by nagesh
Uddhav Thackeray | uddhav thackerays reaction on income tax raid at bbc office

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – शिवसेना पक्षात बंडखोरी झाल्यानंतर शिवसेना पक्षात दोन गट निर्माण झाले होते. यानंतर दोन्ही गटांनी शिवसेना पक्षावर दावा केल्यानंतर मुळ शिवसेना पक्ष कुणाचा असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावर हा वाद सध्या निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टात सुरू आहे. त्यातच आता नवीन पेच शिवसेनेच्या ठाकरे गटासमोर आला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पक्षप्रमुख पदाची मुदत येत्या २३ जानेवारीला संपणार आहे. २०१८ मध्ये दुसऱ्यांदा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची पक्षप्रमुख म्हणून सर्वानुमते निवड झाली होती.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

त्यातच आता २३ जानेवारी रोजी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा ५ वर्षांचा पक्षाध्यक्षपदाचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. त्यामुळे आता पुढे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यावर शिवसेना नेते अनिल देसाईंनी प्रतिक्रिया दिली. अनिल देसाई म्हणाले की, ‘आमच्या वकिलांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुखपदाचा कार्यकाळ संपण्याआधी पक्षांतर्गत निवडणूका घेऊ देण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. यामध्ये राष्ट्रीय कार्यकारिणी निवड देखील समाविष्ट आहे. असे अनिल देसाई म्हणाले.

 

तसेच याबाबत पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘जर आयोगाला पक्षांतर्गत निवडणुका घेण्यावर काही आक्षेप असेल, तर त्यांनी निर्णय होईपर्यंत उद्धव ठाकरे यांच्या प्रमुखपदाची मुदत वाढवावी.’ अशी मागणी देखील उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात आल्याचे अनिल देसाई यांनी सांगितले. (Shivsena Thackeray Faction)

 

दरम्यान, राज्यातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीला सुप्रीम कोर्टाकडून पुढची तारिख देण्यात आली आहे.
काल सुप्रीम कोर्टाच्या ५ न्यायामूर्तींच्या घटनापीठासमोर झालेल्या सुनावणी वेळी या प्रकरणाची पुढील सुनावणी
ही १४ फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार असल्याचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड म्हणाले.
त्याअगोदर याप्रकरणात ठाकरे गटाच्या वकिलांकडून नबाम रेबिया प्रकरणाचा दाखला देत ७ न्यायामूर्तींच्या
घटनापीठापुढे ही सुनावणी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे.
त्यामुळे या प्रकरणाच आता ७ न्यायामूर्तींचे घटनापीठ स्थापन होणार का.
याचे उत्तर आता १४ फेब्रुवारीलाच मिळणार आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Uddhav Thackeray | shivsena anil desai on term end of uddhav thackeray as shivsena party chief

 

हे देखील वाचा :

Johnson And Johnson Baby Powder | ‘जॉन्सन अँड जॉन्सन’ प्रकरणात हायकोर्टाचा ‘एफडीए’ला दणका; कंपनीला बेबी पावडर विक्रीस परवानगी

Chandrashekhar Bawankule | ‘पटोलेंचा दावा म्हणजे उंटावरून…’; भाजप प्रदेशाध्यक्ष प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची नाना पटोलेंवर टीका

Pune Pimpri Crime | भर चौकात महिलेसोबत गैरवर्तन करणारा रिक्षाचालक गजाआड, तळेगाव दाभाडे येथील घटना

 

Related Posts