IMPIMP

CM ठाकरेंचे मुख्य सचिवांना आदेश, म्हणाले – ‘Lockdown ची तयारी करा’

by bali123
lockdown in maharashtra cm uddhav thackeray directs chief secretary to plan strategy

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा फैलाव वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav thackeray  यांनी लॉकडाऊनसारखे अतिशय कडक निर्बंध लावण्याच्या सूचना केल्या आहेत. जर निर्बंध आणि नियमांचे कडक पालन होणार नसेल तर येत्या काही दिवसात संपूर्ण लॉकडाऊन लावण्याचे संकेतही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

‘Lockdown पर्याय होऊ शकत नाही’, भाजपनंतर राष्ट्रवादीचा लॉकडाऊनला विरोध; CM ठाकरेंची ‘कोंडी’?

होळी आणि रंगपंचमीनंतर कोरोना आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने तयारी सुरू केली आहे. राज्याच्या मुख्य सचिवांना मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनची योजना आखण्याचे आदेश दिले आहेत. एकीकडे आपण कोविड परिस्थितीतही अर्थव्यवस्था सुरु राहील याचा आटोकाट प्रयत्न करतोय मात्र अनेक घटक अजूनही ही गोष्ट गांभीर्याने घेत नाहीत, याबाबत मुख्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली आहे. अतिशय कठोरपणे नियमांचे पालन करावे अन्यथा लॉकडाऊन करावे लागेल, असे समजून धान्य पुरवठा, औषधी, अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सुविधा आदीचे नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी uddhav thackeray  सचिवांना दिले आहेत. पुढे जाऊन मृत्यू संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आयसीयू, व्हेंटीलेटर्स पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवावे. गृह विलगीकरणापेक्षा संस्थात्मक विलगीकरण करण्यावर भर द्यावा. विशेषत: वृद्ध आणि सहव्याधी रुग्णांना प्राधान्याने उपचार मिळावेत. सहव्याधी असलेल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम पद्धतीने काम द्यावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

Also Read

‘पोलिस दलात पैसे खात नाही असा कर्मचारी, अधिकारी नाही’, जाणून घ्या नेमकं काय म्हणाल्या माजी DG मीरा बोरवणकर

 

CM उद्धव ठाकरेंचा शरद पवारांना फोन, केली प्रकृतीची विचारपूस

 

पवार-शहा भेटीवर भाजपची अधिकृत भूमिका, प्रदेशाध्यक्ष म्हणाले…

 

शिवसेना खासदाराचा विरोधी पक्षाच्या नेत्यांना खोचक सल्ला, म्हणाले – ‘महाराष्ट्राला खूप काम करायचं आहे, आरोपांचे रंग उधळू नका’


शरद पवारांची प्रकृती बिघडली; ‘ब्रीच कँडी’ हॉस्पीटलमध्ये बुधवारी ‘अँडोस्कोपी’ आणि ‘शस्त्रक्रिया’

 

होळी : रंगांचा सण आणि जातीवादाच्या विरूद्ध एका संताच्या संघर्षाची कथा?

 

खासदार नवनीत राणांचा विनामास्क ‘कोरकू’ डान्स तुफान व्हायरल !

 

जेव्हा स्टेजवर डान्स करू लागले भाजप आणि काँग्रेसचे टॉपचे 2 नेते, पाहा व्हिडीओ

 

लोकप्रिय मराठी गायिका वैशाली माडे ‘या’ दिवशी करणार राष्ट्रवादीत प्रवेश !

 

West Bengal Assembly Elections : मिथुन चक्रवर्ती यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा ! PM मोदींनी आदेश दिल्यास ममता बॅनर्जी विरोधात…

Related Posts