IMPIMP

‘Lockdown पर्याय होऊ शकत नाही’, भाजपनंतर राष्ट्रवादीचा लॉकडाऊनला विरोध; CM ठाकरेंची ‘कोंडी’?

by bali123
lockdown cannot be option now ncp also oppose lockdown maharashtra

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. दिवसेंदिवस धडकी भरवणारे आकडे समोर येत आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण पडू लागला आहे. नागरिकांना कोविड-19 च्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र, त्याचा काहीही परिणाम होताना दिसून येत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेने नियम पाळले नाही तर कठोर लॉकडाऊन करावा लागेल असे संकेत दिले आहेत. त्यातच मुख्यमंत्र्यांनी सचिवांना लॉकडाऊनची lockdown तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत.

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुक : राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार जाहीर

मुख्यमंत्र्यांनी लॉकाऊनचे lockdown संकेत दिले आहेत. मात्र याला भाजपने यापूर्वीच विरोध केला आहे. सत्तेत सहभागी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने देखील राज्यातील लॉकडाऊनला विरोध केला आहे. लॉकडाऊन हा पर्याय होऊ शकत नाही, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली आहे. राष्ट्रवादीने घेतलेल्या या भूमिकेमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची कोंडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

‘पवार-शाह’ यांच्या भेटीवर संजय राऊतांचं Tweet ! म्हणाले – ‘मी ठामपणे सांगतो…’

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी लॉकडाऊनला विरोध केला आहे. राज्यात कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत, हे सत्य आहे. मात्र लॉकडाऊन हा अंतिम पर्याय होऊ शकत नाही, तसा आग्रहच आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केला असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे. त्यामुळे एकीकडे कोरोना बाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत असताना मुख्यमंत्री लॉकडाऊनचा निर्णय घेणार का याकडे लक्ष्य लागून राहिले आहे.

नवाब मलिक यांनी सांगितले की, लॉकडाऊन lockdown राज्याला परवडणारा नाही. तो जनतेलाही परवडणारा नाही. त्यामुळे लॉकडाऊन हा अंतिम पर्याय होऊ शकत नाही. त्याऐवजी आरोग्य सुविधा वाढवण्यावर भर दिला पाहिजे, अशी भूमिका राष्ट्रवादीची आहे. मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, लोकांनी देखील काळजी घेतली पाहिजे. तसेच कोरोना नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. नियम पाळले गेले तर कोरोनाचा प्रसार होणार नाही, असे मलिक यांनी म्हटले आहे.

Also Read

‘पोलिस दलात पैसे खात नाही असा कर्मचारी, अधिकारी नाही’, जाणून घ्या नेमकं काय म्हणाल्या माजी DG मीरा बोरवणकर

CM उद्धव ठाकरेंचा शरद पवारांना फोन, केली प्रकृतीची विचारपूस

पवार-शहा भेटीवर भाजपची अधिकृत भूमिका, प्रदेशाध्यक्ष म्हणाले…

 

शिवसेना खासदाराचा विरोधी पक्षाच्या नेत्यांना खोचक सल्ला, म्हणाले – ‘महाराष्ट्राला खूप काम करायचं आहे, आरोपांचे रंग उधळू नका’


शरद पवारांची प्रकृती बिघडली; ‘ब्रीच कँडी’ हॉस्पीटलमध्ये बुधवारी ‘अँडोस्कोपी’ आणि ‘शस्त्रक्रिया’

 

होळी : रंगांचा सण आणि जातीवादाच्या विरूद्ध एका संताच्या संघर्षाची कथा?

 

खासदार नवनीत राणांचा विनामास्क ‘कोरकू’ डान्स तुफान व्हायरल !

 

जेव्हा स्टेजवर डान्स करू लागले भाजप आणि काँग्रेसचे टॉपचे 2 नेते, पाहा व्हिडीओ

 

लोकप्रिय मराठी गायिका वैशाली माडे ‘या’ दिवशी करणार राष्ट्रवादीत प्रवेश !

 

West Bengal Assembly Elections : मिथुन चक्रवर्ती यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा ! PM मोदींनी आदेश दिल्यास ममता बॅनर्जी विरोधात…

Related Posts