IMPIMP

नोकरीची सुवर्णसंधी ! ESIC मध्ये 6 हजारांहून अधिक पदांसाठी मेगा भरती, 81 हजारापर्यंत पगार

by pranjalishirish
Modi Government | modi government announced to assure of financial support to covid19 affected esic employees

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – बारावी उत्तीर्ण उमेदवारांपासून पदवीधरांपर्यंत तरुणांसाठी नोकरीची सुवर्ण संधी आहे. कर्मचारी राज्य बीमा निगम (ESIC) मध्ये 6 हजार 552 पदांवर मेगा भरती करण्यात येणार आहे. कोरोना काळात नोकरी मिळवण्याची ही सुवर्ण संधी आहे. ही भरती ग्रुप सीच्या पदांवर करण्यात येणार आहे. पे-स्केल 81 हजार रुपये प्रतिमहिना आहे.

अशी होणार निवड

अपर डिव्हीजन क्लार्क (ESIC UDC) ते स्टेनोग्राफर (Stenographer) या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. केंद्र सरकारने भारताच्या
राजपत्रात यासंबंधीचे नोटिफिकेशन काढले आहे. ESIC अपर डिव्हीजन क्लार्क पदांसाठी ऑनलाइन चाचणीद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. ESIC स्टेनोग्राफरसाठी टायपिंग टेस्ट घेतली जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा

ESIC UDC साठी उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवीधर असणे गरजेचे आहे. स्टेनोग्राफर या पदासाठी मान्यता प्राप्त
बोर्डातून कोणत्याही विषयासह बारावी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. या पदासाठी उमेदवारांचा हिंदी व इंग्रजी टायपिंग स्पिड 80 शब्द प्रतिमिनीट
असणे आवश्यक आहे. सर्व पदांसाठी उमेदवारांचे वय किमान 18 ते कमाल 27 वर्षे असावे. आरक्षित वर्गासाठी कमाल वयोमर्यादेत सवलत मिळणार आहे.

पदांची माहिती

अपर डिव्हीजन क्लार्क (UDC)/ अपर डिव्हीजन क्लार्क कॅशिअरची 6 हजार 306 पदे, स्टेनोग्राफरची 246 पदे, अशी एकूण 6552 पदे भरण्यात येणार आहेत.

पे-स्केल

या पदांसाठी पे-स्केल 25 हजार 500  रुपये ते 81 हजार 100 रुपये प्रतिमहिना मिळू शकते. या वेतन श्रेणीत टीए, डीए यासह इतर भत्ते जोडून वेतन
मिळणार आहे.

कसा करायचा अर्ज

या पदांसाठी लवकरच ईएसआईसीची बेवसाइट esic.nic.in वर अर्जाची माहिती दिली जाणार आहे.

Also Read :

‘मुंबई पोलिसांचे, थोबाड काळे झाले’, पोलिसांबद्दल फडणवीस असं कसं बोलू शकतात ?

नाना पटोलेंचा हल्लाबोल, म्हणाले – ‘ज्वलंत प्रश्नांवरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भाजपकडून वाझेंना टार्गेट

Related Posts