IMPIMP

नवीन आर्थिक वर्षात ‘हे’ काम न केल्यास भरावा लागेल दुप्पट Tax ! घ्या ‘ही’ खबरदारी

by pranjalishirish
ITR Update | itr update can you set off losses in stock market to reduce your tax liabilities

सरकारसत्ता ऑनलाइन – नव्या आर्थिक वर्षात 1 एप्रिल 2021 पासून इन्कम टॅक्सच्या  income tax नियमात काही बदल प्रस्तावित केले आहेत. काही नियमांमध्ये दिलासा देण्यात आला आहे, तर काहींमध्ये मात्र अशा तरतुदी आहेत ज्यात थोडीही चूक झाली तर डबल टॅक्स भरावा लागेल. अशाच काही नियमांबद्दल आपण माहिती घेणार आहोत. यामुळं तुमच्या खिशावर होणारा परिणामही कमी होऊ शकतो. खास बात अशी की, आयटीआर दाखल न करणाऱ्यांसाठी सरकारनं अतिशय कठोर नियम केले आहेत. याअंतर्गत त्यांना दुप्पट टीडीएस भरावा लागणार आहे.

ITR न भरल्यास भरावा लागेल दुप्पट TDS

कलम 206 एबी ला सरकारनं इन्कम टॅक्स income tax  कायद्यात जोडलं आहे. जर तुम्ही आयटीआर दाखल केला नाही तर 1 एप्रिल 2021 पासून तु्म्हाला दुप्पट टीडीएस भरावा लागेल. नवीन नियमांनुसार, ज्यांनी इन्कम टॅक्स रिटर्न फाइल नाही केले, त्यांच्यावर टॅक्स कलेक्शन अॅक्ट सोर्स (टीसीएस) देखील जास्त लागू शकेल. नवीन नियमांनुसार पीनल टीडीएस आणि टीसीएलचे दर जुलै 2021 पासून 10-20 टक्के असतील. हे सहसा 5-10 टक्के असते.

EPF मध्ये 2.5 लाखांपर्यंत गुंतवणूकच टॅक्स फ्री

2021-22 च्या अर्थसंकल्पात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) कडून मिळालेल्या व्याजावर टॅक्स income tax जाहीर करण्यात आला आहे. संसदेत अर्थसंकल्प मंजूर होताच नवीन आर्थिक वर्षापासून एका आर्थिक वर्षात अडीच लाखांपर्यंतची ईपीएफमधील गुंतवणूक टॅक्स फ्री होईल. त्यापेक्षा जास्त गुंतवणूक केल्यास अतिरिक्त रकमेसाठी आपला विचार केला जाईल.

LTC योजनेचा फायदा

ट्रॅव्हल लीव्ह कन्सेशन (एलटीसी) कॅश व्हाउचर योजना नवीन आर्थिक वर्षात लागू होईल. कोरोनामुळं लागू करण्यात आलेल्या प्रवासी बंदीमुळं एलटीसी टॅक्स लाभ न मिळालेल्या कर्मचाऱ्यांसाठी ही योजना सुरू केली गेली आहे.

ITR फाइल करणं हे प्री फिल्ड आयटीआर फॉर्ममुळं सोपं होईल

इंडिव्हिजुअल टॅक्सपेयर्सना (वैयक्तिक करदाते) आता 1 एप्रिल 2021 पासून प्री फिल्ड आयटीआर फॉर्म दिला जाणार आहे. कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी आणि इन्कम टॅक्स रिटर्न करण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे.

75 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना ITR फाइल करण्यापासून सवलत

1 एप्रिल 2021 पासून अर्थसंकल्पात 75 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना आयटीआर न भरण्याची सवलत प्रस्तावित करण्यात आली आहे. निवृत्तिवेतन किंवा मुदत ठेवींवरील व्याजावर अवलंबून असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना ही सूट देण्यात आली आहे. यासाठी ज्या बँकेत त्यांचे खाते असेल तेथे एफडी वगैरे असाव्यात.

Also Read : 

भिवंडी महापालिकेच्या सभागृह नेतेपदी कामिनी पाटील

Related Posts