IMPIMP

पोस्टाची जबरदस्त योजना !  फक्त 100 रुपयात अकाउंट उघडा अन् 7000 रुपये मिळवा, जाणून घ्या

by sikandershaikh
post-office

सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)सर्व भारतीयांचे पोस्ट ऑफिसशी (post office) विश्वासाचे नाते आहे. बॅंकेपेक्षा कमी व्याज मिळाले तरी चालेल पण पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी लोक पोस्टात गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. पोस्ट ऑफिस (post office) विविध बचत योजना राबवते. या स्कीमच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिक, महिला चांगल्या व्याजासकट आपल्या पैशांची बचत करु शकतात. पोस्टाची नॅशनल सेव्हिंग रिकरिंग डिपॉजिट अकाउंट ही स्कीम सध्या चांगलीच चर्चेत आहे. या स्कीमअंतर्गत गुंतवणूकदारांना सध्या 5.8 टक्के व्याज मिळत आहे. गत वर्षाच्या 1 एप्रिलपासून हा व्याजदर आहे.

या योजनेचा फायदा घेण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला पोस्टात खाते उघडावे लागणार आहे. या योजनेअंतर्गत तुम्ही दर महिन्याला 100 रुपये जमा करु शकता. यापेक्षा जास्त रक्कमही जमा करता येऊ शकते. आरडी अकाउंट तुम्हाला  5 वर्षांसाठी सुरु करता येऊ शकते.
तुम्ही या योजनेचे पैसे कॅश किंवा चेकद्वारेही भरु शकता.
दरमहा 100 रुपये जमा केले तर या योजनेनुसार तुम्हाला शेवटी 7000 रुपये मिळतील.
तुम्ही 18 फेब्रुवारी 2021 पासून या योजनेअंतर्गत गुंतवणूक करत असाल तर 18 फेब्रुवारी 2026 पर्यंत त्याचा मॅच्यूरिटी पिरिअड असणार आहे.
5 वर्षात तुम्ही दर महिन्याला 100 रुपये भरले तर एकूण जवळपास 6000 रुपये रक्कम जमा होईल. त्यावर एकूण 5.8 टक्के व्याज मिळेल.

या योजनेचा फायदा घेण्यासाठी तुम्ही सिंगल किंवा जॉइंट अकाउंट उघडू शकता.
विशेष म्हणजे या आरडी अकाउंटवर लोनची देखील सुविधा आहे.
या योजनेअंतर्गत तुम्ही अर्ध्यातही तुमचे खाते बंद करु  शकता.
तुमच्याकडे पैसे नसतील किंवा इतर काही कारणाने तुम्ही दर महिन्याला सगल 5 वर्ष पैसे भरु शकणार
नसला तर तुम्हाला 3 वर्षातही आपले पैसे काढून खाते बंद करता येऊ शकते.

श्रीलंकेकडून इम्रान खानची चांगलीच ‘हेटाई’ , संसदेत बोलण्याचे आमंत्रण देऊन रद्द केला कार्यक्रम; काश्मीर ‘कनेक्शन’

Related Posts