IMPIMP

Corona 3rd Wave | तिसऱ्या लाटेचा मुंबई, पुण्याला सर्वाधिक धोका

by nagesh
Corona 3rd Wave | coronavirus third wave danger highest mumbai pune and 60 lakh patients state

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन –  Corona 3rd Wave | कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत (Corona 3rd Wave) देण्यात येत आहे. या लाटेचा सर्वाधिक परिणाम मुंबई आणि पुणे येथे जाणवणार असून या दोन शहरांमध्ये सर्वाधिक रुग्णांची नोंद केली जाऊ शकते. तर राज्यात बाधितांची संख्या ६० लाखाच्यावर जाऊ शकते असे महत्वपूर्ण निरीक्षण सार्वजनिक आरोग्य विभागाने नोंदवले आहे.

दुसऱ्या लाटेत ११ मार्च रोजी दिवसाला ९१,१०० कोरोना रुग्णांची भर पडत होती.
हाच आकडा तिसऱ्या लाटेत मुंबईसाठी दिवसाला १ लाख ३६ हजार रुग्णांपर्यंत पोहोचू शकतो.
पुण्यात १९ मार्च रोजी दिवसाला १.२५ लाख रुग्णांची नोंद झाली होती.
तिसऱ्या लाटेत हीच संख्या तब्बल १.८७ लाख रुग्णांपर्यंत पोहोचू शकते.
असेही आरोग्य विभागाने म्हंटले आहे. त्यामुळे या दोन शहरातील बाधितांची संख्या नियंत्रणात किंबहुना या लाटेवर मत करण्यासाठी आरोग्य विभागाला सर्वसमावेशक आराखडा तयार करण्याची गरज असून त्या दृष्टीने काम सुरू असल्याचेही आरोग्य विभागाने सांगितले.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

तिसऱ्या लाटेच्या अंदाजात मुंबईत व्यक्त करण्यात आलेले शिखर हे १.३६ लाख रुग्णांचे आहे.
यात ८८ हजार ८२३ रुग्णांना होम क्वारंटाइन, ४७ हजार ९२८ रुग्णांना रुग्णालयात आणि ९५७ रुग्णांना अतिदक्षता विभागातील खाटांची गरज भासू शकते.
तर पुण्याच्या बाबतीत १.२१ लाख रुग्णांवर होम क्वारंटाइन आणि १३१४ रुग्णांना अतिदक्षता खाटांची गरज भासू शकते.
ठाण्यातही तशीच काहीशी परिस्थिती असून तिसऱ्या लाटेत बाधितांची संख्या १.३ लाखांपर्यंत पोहोचू शकतो आणि ९११ जणांना अतिदक्षता खाटांची गरज भासू शकते.
दुसऱ्या लाटेत दैनंदिन रुग्णवाढीचे शिखर ८६ हजार ७३२ पोहोचले होते.
नागपूरमध्ये रुग्णसंख्या ८० हजारांवरून वाढून १.२१ लाख इतकी होऊ शकते.
यात ८५० जणांना अतिदक्षता विभागातील खाटांची गरज पडेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

दरम्यान, तिसऱ्या लाटेत मुंबईला २५० मेट्रिक टन (एमटी) ऑक्सिजनची गरज भासू शकते. पुण्यात हाच आकडा २७० मेट्रिक टन इतका होऊ शकतो. ठाण्यात १८७ एमटी, नागपुरात १७५ एमटी व नाशिकला ११४ एमटी इतक्या ऑक्सिजनची गरज पडू शकते.

 

Web Title : Corona 3rd Wave | coronavirus third wave danger highest mumbai pune and 60 lakh patients state

 

हे देखील वाचा :

Thane News | नारायण राणे विरुद्ध शिवसेना वादात ‘बदला’ घेण्याचा प्रयत्न; ठाण्यात शिवसेना शाखा प्रमुखावर ‘जीवघेणा हल्ला’

Pune Crime | पुण्यात 85 लाखाच्या फसवणूक प्रकरणी कमलेश नायरविरूध्द गुन्हा

Pune Crime | … म्हणून न्यायालयात केली बनावट कागदपत्रे सादर ! पती व सासर्‍यांवर गुन्हा दाखल

 

Related Posts