IMPIMP

Jos Buttler | IPL च्या यंदाच्या सीझनमधील बटरल ठरला पहिला शतकवीर, ‘इतक्या’ चेंडूत केलं पुर्ण शतक !

by nagesh
Jos Buttler | ipl 2022 mi vs rr jos buttler scored first century of this season

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Jos Buttler | आयपीएलच्या यंदाच्या सीझनमधील पहिलं शतक हे राजस्थान रॉयल्सच्या जॉस बटलरने (Jos Buttler) ठोकलं आहे. मुंबई इंडिअन्स आणि राजस्थान रॉयल्स (Mumbai Indians Vs Rajasthan Royals) यांच्यातील सामन्यात मुंबईने नाणेफेक (Toss) जिंकत प्रथम गोलंदाजी (Bowling) करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या राजस्थान संघाने (Rajasthan Royals) मुंबईला 194 धावांचं लक्ष्य दिलं आहे. (First Century In IPL 2022)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

जोस बटलरने (Jos Buttler) सलामीला आल्यावर आपले इरादे स्पष्ट केलं. त्याचा जोडीदार यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) या सामन्यातही अपयशा ठरला. त्याला बुमराहने (Bumrah) माघारी अवघ्या 1 धावेवर माघार धाडलं. त्यानंतर आलेल्या देवदत्त पडिक्कलला खेळपट्टीवर तग धरता आला नाही. 7 धावांवर तो माघारी परतला, मात्र दुसरीकडे बटलरने आपली आपला दांडपट्टा चालू ठेवला होता.

 

बटलरने तर मुंबईच्या थम्पीच्या पहिल्याच षटकात तब्बल 26 धावा झोडल्या. बटलरने आपल्या झंझावती खेळीत पाच षटकार आणि अकरा चौकारांची आतिषबाजी केली. बटलर खेळपट्टीवर असताना राजस्थान 200 पेक्षा जास्त धावा करेल असं वाटत होतं मात्र त्याची विकेट जाताच राजस्थानची गाडी रुळावरून घसरली.

 

दरम्यान, बटलरसोबत कर्णधार संजू सॅमसनने (Sanju Samson) आक्रमक 30 धावांची खेळी केली.
त्यासोबतच हेटमायरने 14 धावांमध्ये 35 खेळी केली आहे. यामध्ये 3 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता.
मुंबई आता धावांचं लक्ष्य पार करतं की नाही पाहावं लागणार आहे.

 

Web Title :- Jos Buttler | ipl 2022 mi vs rr jos buttler scored first century of this season

 

हे देखील वाचा :

Gurmar For Diabetes | डायबिटीजच्या रूग्णांसाठी एखाद्या खजिन्यापेक्षा कमी नाही ‘या’ वनस्पतीची पाने, केवळ रिकाम्या पोटी करा सेवन

Ananya Panday Braless Look | अनन्या पांडेनं केलं ब्रालेस फोटोशूट, फोटो पाहून चाहते झाले घायाळ…!

Ajit Pawar | मुख्यमंत्री बघा कसे सडपातळ ! ‘पोलिसांनो, सुटलेली पोटं कमी करा, आर्मीतल्या जवानांसारखा फिटनेस ठेवा’ – अजित पवार

 

Related Posts