IMPIMP

Parambir Singh Extortion Case | परमबीर सिंह वसूली केसमध्ये गँगस्टर छोटा शकीलचा भाऊ अन्वरविरूद्ध सुद्धा गुन्हा दाखल, जाणून घ्या प्रकरण

by nagesh
Parambir Singh | former mumbai cp parambir singh in chandigarh

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Parambir Singh Extortion Case | मुंबईचे माजी पोलीस कमिश्नर परमबीर सिंह (Parambir Singh Extortion Case) यांच्याकडून संबंधित वसूली केसमध्ये आता अंडरवर्ल्डच्या कनेक्शनची चौकशी सुद्धा सुरू झाली आहे. याबाबत मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने गँगस्टर छोटा शकील (Gangster Chhota Shakeel) चा छोटा भाऊ अन्वरच्या विरूद्ध केस दाखल केली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

शकीलचा एक ऑडिओ सापडला

अन्वर आणि आणखी दोघांविरूद्ध एक्स्टॉर्शन संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाशी
संबंधित दोन लोकांना अटक सुद्ध केली आहे. परमबीर केसचा तपास करत असलेल्या एसआयटीला
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा उजवा हात छोटा शकीलचा एक ऑडिओ सापडला आहे ज्यामध्ये तो
एका बिल्डरला धमकी देत आहे.

 

 

परमबीर वसूली कांडाशी संबंध

मुंबई क्राईम ब्रँचच्या सूत्रांनुसार, अन्वरविरूद्ध हाच ऑडिओ समोर आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात
आला आहे, मात्र, या गुन्ह्याचे धागेदोरे सुद्धा परमबीर वसूली कांडाशी जुळताना दिसत आहेत. मिळालेल्या
माहितीनुसार हा ऑडिओ 2016 चा असल्याचे सांगितले जात आहे. त्यावेळी परमबीर सिंह ठाण्याचे पोलीस
कमिश्नर होते.

 

 

छोटा शकीलने केला बिल्डरला धमकीचा कॉल

हा धमकीचा कॉल छोटा शकीलने संजय पुनमिया नावाच्या बिल्डरला केला होता. तपासात समोर आले की, ऑडियोमध्ये छोटा शकील संजय पुनमिया नावाच्या बिल्डरला धमकी देत आहे की, बिल्डर श्याम सुंदर अग्रवालशी तडजोड करून घे.

 

 

श्याम सुंदर अग्रवालने दाखल केले आहे प्रकरण

श्याम सुंदर अग्रवाल तोच व्यक्त आहे, ज्याने परमबीर सिंह यांच्यासह 6 पोलीस अधिकार्‍यांविरूद्ध वसूलीचे प्रकरण दाखल केले आहे. श्याम सुंदर अग्रवालने मुंबई पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले की, परमबीर सिंह यांनी त्यास बनावट प्रकरणात फसवले होते आणि त्याच्यावर मकोका अंतर्गत केस दाखल केली होती.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 परमबीर सिंहंच्या साथीदारांकडून ठार मारण्याची धमकी

श्याम सुंदरने आरोप केला आहे की, परमबीर सिंह आणि त्यांचे काही साथीदार पोलिसांनी त्याला जीव ठार मारण्याची धमकी दिली तसेच सुरक्षा देण्याच्या नावाखाली पैसेसुद्धा वसूल केले. श्याम सुंदर अग्रवालचे म्हणणे आहे की, परमबीर सिंह ठाणे पोलीस कमिश्नर असताना त्याच्याकडून जबरदस्तीने वसूली करण्यात आली होती.

 

 

छोटा शकीलचा आहे फोन नंबर

क्राईम ब्रँचच्या सूत्रांनुसार, बिल्डर संजय पुनमियाला ज्या नंबरवरून फोन करण्यात आला होता, तो नंबर छोटा शकीलच वापरतो. हा नंबर अगोदरपासूनच पोलीस रेकॉर्डमध्ये आहे. संजय पुनमियाच्या तक्रारीवरच मुंबई पोलिसांनी श्याम सुंदर अग्रवालच्या विरूद्ध गुन्हा दाखल केला होता.

 

 

फोन रेकॉर्डिंग 2016 चे

शकील आणि पुनमियामधील हे फोन रेकॉर्डिंग 2016 चे आहे परंतु यावर कारवाई याच वर्षी फेब्रुवारीमध्ये झाली. आता श्याम सुंदर अग्रवालच्या तक्रारीवर मुंबई पोलिसांनी संजय पुनमिया आणि परमबीर सिंह यांच्यासह 6 पोलिसांच्या विरूद्ध वसूलीचे प्रकरण दाखल केले आणि SIT चौकशी सुरू आहे.

 

 

परमबीर गँगचे धागेदोरे छोटा शकीलसोबत

तपासात समोर आले आहे की, परमबीर सिंह आणि त्याच्या साथीदारांनी श्याम सुंदरकडून पैसे
मागितले होते आणि ते न मिळाल्याने त्याच्याविरूद्ध बनावट गुन्हा दाखल केला होता. आता हे सुद्धा
शोधले जात आहे की, ऑडियोमध्ये जर छोटा शकीलचा खरा आवाज आहे तर हे स्पष्ट आहे की
परमबीर गँगचे धागेदोरे छोटा शकीलसोबत सुद्धा जुळलेले होते.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

श्याम सुंदरवर सुद्धा डझनवारी गुन्हे

या वसूली कांडात अंडरवर्ल्डची सुद्धा भागीदारी होती. मात्र, तपासात हे सुद्धा समोर आले आहे की,
श्याम सुंदर अग्रवालच्या विरूद्ध सुद्धा मुंबईच्या विविध पोलीस ठाण्यांमध्ये एक डझनपेक्षा जास्त
प्रकरणे दाखल आहेत आणि त्याचे गुन्हेगारांशी असलेले संबंध समोर आले आहेत. या प्रकरणात
संजय पुनमियाला अटक करण्यात आलेली आहे.

 

Web Title : Parambir Singh Extortion Case | mumbai case filed against anwar brother of gangster chhota shakeel in parambir singh extortion case know what is the matter

 

हे देखील वाचा :

RBI Rules | चेक देण्यापूर्वी करू नका ही चूक, अन्यथा भरावा लागेल दंड! जाणून घ्या RBI चे नवीन नियम

SBI Rules | जर तुमच्या फोनवर येत नसेल OTP तर तात्काळ करा ‘हे’ काम, अशी करता येईल तक्रार; जाणून घ्या

Mumbai Unlock | मुंबईकरांना आणखी दिलासा ! आजपासून मैदाने, उद्याने, चौपाट्या मुंबईकरांसाठी खुले, BMC चा निर्णय

 

Related Posts