IMPIMP

‘सासरी पत्नीला झालेल्या प्रत्येक दुखापतीसाठी पतीच जबाबदार’ : सुप्रीम कोर्ट

by bali123
Maharashtra Local Body Election | supreme court directed maharashtra state election commission to announce schedule for local bodies election on 17 may 2022

सरकारसत्ता ऑनलाइन – आपल्या पत्नीला मारहाण करणाऱ्या एका व्यक्तीला जामीन देण्याची विनंती याचिका सुप्रीम कोर्टानं supreme court फेटाळली आहे. सासरमध्ये पत्नीला होणाऱ्या मारहाणीसाठी पतीच जबाबदार आहे, असं कारण कोर्टानं यावेळी दिलं आहे. सुप्रीम कोर्टानं supreme court म्हटलं आहे की, पत्नीला दुखापत कुटुंबातील इतर सदस्यांकडून झाली असली तरी त्यासाठी पतीला जबाबदार धरलं जावं. विशेष म्हणजे मारहाण करणाऱ्या व्यक्तीचं हे तिसरं लग्न आहे तर महिलेचं दुसरं लग्न आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, सदर जोडप्यानं लग्नाला एक वर्ष झाल्यानंतर 2018 मध्ये एका बाळाला जन्म दिला. मागील वर्षी जून महिन्यात महिलेनं लुधियाना पोलीस ठाण्यात पती आणि सासरच्या विरोधात तक्रार दाखल केली. महिलेनं आरोप केला होता की, हुंड्याची मागणी पूर्ण करू न शकल्यानं पती, सासू आणि सासरे मारहाण करत आहेत आणि छळ करत आहेत.

कुशाग्र महाजन हे पतीची बाजू मांडणारे वकील आहेत. त्यांनी आरोपीला अंतरिम जामीन देण्याची मागणी केली होती. चीफ जस्टीस ऑफ इंडिया एसए बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं म्हटलं की, तुम्ही कशा पद्धतीचे व्यक्ती आहात. महिलेनं आरोप केलाय की, पती तिला गळा दाबून मारणार होता. तिचा आरोप आहे की, तिचा गर्भपात झाला आहे. तुम्ही पत्नीला क्रिकेट बॅटनं मारता ? कसे व्यक्ती आहात तुम्ही.

महिलेनं स्वत: आरोप केलाय की, तिचे सासरे तिला मुलाच्या हातून मारहाण करतात, असं वकील म्हणाल्यानंतर यावर सीजेआय यांच्या अध्यक्षतेखालील पीठानं म्हटलं की, यामुळं काहीही फरक पडत नाही की, त्याचे वडील मुलाच्या हातून मारहाण करतात. सासरमध्ये जेव्हा एका महिलेला दुखापत किंवा इजा होते, तेव्हा त्याची प्राथमिक जबाबदारी पतीची असते असं म्हणत कोर्टानं व्यक्तीची जामिनाची याचिका फेटाळून लावली. पंजाब आणि हरियाणा कोर्टानंही याआधी पतीला अंतरिम जामीन देण्यास नकार दिला होता.

Related Posts