IMPIMP

Mumbai Police | विविध चोरीच्या घटनांमध्ये मुंबईतील महिलेला आतापर्यंत 50 वेळा अटक

by bali123
mumbai crime news woman arrested domestic help house theft property cell of the crime branch

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – मुंबईतील एका महिलेला अडीच हजार डॉलर्स चोरीच्या प्रकरणावरून मुंबई पोलीस प्रॉपर्टी सेलने (Mumbai Police Property Cell ) अटक केली आहे. 2006 पासून तब्बल 50 वेळा या महिलेला विविध चोरीच्या प्रकरणामध्ये अटक झाल्याचे समोर आले आहे. यावरून पोलिसांनाही एक आश्चर्याचा धक्का बसला आहे. ती प्रत्येक वेळी नाव बदलून काम शोधते असेही पोलिसांच्या निदर्शनास आले आहे.

Ministry of Home Affairs | दुसर्‍या लाटेपेक्षा सुध्दा भयंकर असू शकते तिसरी लाट

अटक केलेल्या महिलेचे नाव वनिता गायकवाड (Vanita Gaikwad) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तेथील फॅशन डिझायनर (fashion designer ) असलेल्या दीपिका गांगुली (Deepika Ganguly) (रा. विले पार्ले पश्चिम मुंबई) यांच्या घरात आरोपी वनिता गायकवाड (Vanita Gaikwad) या महिलेने घरकाम करण्याची नोकरी मिळवली. फॅशन डिझायनर दीपिका गांगुली (Deepika Ganguly) यांच्या घरात झालेल्या चोरीच्या प्रकरणावरून त्या महिलेला अटक केली आहे. यादरम्यान दीपिका गांगुली (Deepika Ganguly) यांनी त्या महिलेकडे कागदपत्रांची मागणी केली. परंतु, कागदपत्रे हरवली आहेत, काही दिवसामध्ये जमा करते, असे त्या महिलेने म्हटलं होतं.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , facebook page for every update

 

दरम्यान, सीसीटीव्ही फुटेज (CCTV footage) च्या साहाय्याने महिलेची ओळख पटवण्यात आली.
तसेच, गुन्ह्यांच्या नोंदींच्या आधारे तिला किती वेळा अशा प्रकरणात अटक (Arrest) झाली असल्याची माहिती पोलिसांनी सांगितली.
साधारण 10 दिवसांतच वनिता गायकवाड हिने रोख रक्कम चोरली आणि तेव्हापासून पसार झाली.
दीपिका गांगुली यांनी 26 मे रोजी घरात चोरी झाल्याची तक्रार जुहू पोलीस ठाण्या (Juhu Police Thane) त दिली होती.
तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला.
दरम्यान, आतापर्यंत 50 वेळा आरोपी महिलेला अटक करण्यात आलेली आहे.
तर तिला अनेकवेळा दोषीही ठरवलं गेलं आहे, पकडले जाऊ नये म्हणून ही महिला प्रत्येकवेळी नाव बदलते.
असं प्रॉपर्टी सेलमधील वरिष्ठ पीआय शशिकांत पवार (Property Cell PI Shashikant Pawar) यांनी सांगितलं आहे.
तसेच, वनिता गायकवाड हिला विक्रोळी येथे अटक करण्यात आली असून, तिला दोन मुलं आहेत.
तिची दोन्ही मुलं वेगळी राहतात, अशी माहिती देखील पोलिसांनी दिली आहे.

mumbai crime news woman arrested domestic help house theft property cell of the crime branch

Related Posts