IMPIMP

MPSC कुठंतरी कमी पडलं, विद्यार्थ्यांना झालेल्या त्रासाबद्दल अजित पवारांकडून दिलगिरी

by bali123
Coronavirus in Maharashtra : 1 lakh cases in three days, Deputy Chief Minister Ajit Pawar said 'Follow the rules, otherwise complete lockdown'

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – एमपीएससीने गुरुवारी परीक्षा रद्द केल्याची घोषणा केल्यानंतर परीक्षार्थी विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली. पुण्यात विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केल्यानंतर याचे पडसाद राज्यात उमटले. राज्यातील अनेक शहरांमध्ये आंदोलन करण्यात आले. अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रात्री फेसबुक लाइव्हद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधत परीक्षा रद्द होणार नसल्याचे जाहीर केले. एमपीएससीच्या निर्णयासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार ajit pawar यांना विचारण्यात आले असता, त्यांनी एमपीएससीने हे प्रकरण व्यवस्थित हाताळायला हवं होतं, त्यामध्ये एमपीएससी कुठंतरी कमी पडली, असं सांगत दिलगिरी व्यक्त केली.

पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. त्या पार्श्वभूमीवर अजित पवार ajit pawar यांनी आज (शुक्रवार) आढावा बैठक घेतली. आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांना एमपीएससी संदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर अजित पवार बोलत होते. अजित पवार यांनी म्हटले की, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना त्रास झाला याबाबत दुमत नाही. राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून विद्यार्थ्यांना झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, असे पवार म्हणाले.

अजित पवार ajit pawar पुढे म्हणाले, एमपीएससी प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: लक्ष घातले आणि विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. एमपीएससीने नवीन परिपत्रक काढलं. एमपीएससी ही स्वायत्त संस्था असून, या विषयावर विरोधकांनी राजकारण करण्याची गरज नव्हती. सरकार काहीतरी वेगळं करतंय असं भासवण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला. हे चुकीचे असल्याचे अजित पवार यांनी म्हटले. एमपीएससीने हे प्रकरण योग्य पद्धतीने हाताळायला हवे होते. त्यामध्ये एमपीएससी कुठेतरी कमी पडली. यामुळे विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आली. विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरण्याची वेळ यावी ही दुर्दैवी असल्याचे सांगून अजित पवार म्हणाले, कारण नसताना विरोधक रस्त्यावर उतरले. या प्रकरणामध्ये विरोधकांनी केलेले राजकारण दुर्दैवी आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी रात्री एमपीएससीच्या पूर्व परीक्षा होणार असल्याचे जाहीर करून शुक्रवारी (दि.12) नवीन तारीख जाहीर केली जाईल, असे आश्वासन दिले. आज लोकसेवा आयोगाने काढलेल्या नवीन परिपत्रकानुसार 14 मार्च रोजी होणारी परीक्षा आता 21 मार्च रोजी ठरलेल्या वेळेत होणार आहे. तसेच महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 27 मार्च, तर दुय्यम सेवा अराजपत्रिका गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 11 एप्रिल रोजी घेण्यात येणार आहेत.

MPSC Exam Postpond : अजित पवारांनी मांडलं स्पष्ट मत; म्हणाले – ‘MPSC प्रकरण हाताळण्यात कमी पडलं’

Mukesh Ambani Bomb Scare : तिहार जेलमधील दहशतवादी तहसीन अख्तरकडून मोबाईल हस्तगत

वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझेंची नागरी सुविधा केंद्रात बदली

मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी ATS चे ‘क्राइम सीन’ प्रात्याक्षिक

21 तारखेला परीक्षा न झाल्यास पुन्हा आंदोलन करणार; गोपीचंद पडळकरांचा राज्य सरकारला इशारा

Related Posts