IMPIMP

Anil Deshmukh | 100 कोटी वसुली प्रकरण : चौकशीला हजर राहण्याबाबत ED चे अनिल देशमुखांना समन्स, ‘या’ 6 मुद्द्यावर होणार चौकशी

by bali123
Anil Deshmukh | Former home minister anil deshmukhs bail application will be heard on 8 april

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Anil Deshmukh | दरमहा 100 कोटींच्या हप्ता वसुली प्रकरणामुळे चर्चेत आलेले राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना ईडीने (ED) मंगळवारी (दि.29) समन्स बजावून चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. ईडीला 6 प्रकरणात देशमुखांची चौकशी करायची आहे. देशमुखांना ईडीने समन्स बजावल्याने अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या अटकेची शक्यता वर्तवली जात आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची चौकशी का करायची आहे, याची माहिती ईडीचे वकील इंद्रपाल सिंग (Indrapal Singh) यांनी न्यायालयात दिली आहे. देशमुखांकडे असलेली मालमत्ता, नातेवाईकांच्या नावावर असलेली जंगम आणि स्थावर मालमत्ता, 5
वर्षाचा आयकर परतावा. नागपुरातील श्री साई शिक्षण संस्थेचा तपशील, गेल्या 5 वर्षात जमा
झालेली देणगी याची चौकशी करायची आहे.

तसेच देशमुखांचे खासगी सचिव संजीव पालांडे (Private Secretary Sanjeev Palande), स्वीय सहायक कुंदन शिंदे (Self-help Kundan Shinde) यांच्यात काय संवाद झाला. आर्थिक व्यवहाराचा तपशील काय आहे, याबद्दल माहिती जाणून घ्यायची असल्याची भूमिका ईडीने स्पष्ट
केली आहे. ईडीने (ED) न्यायालयात माहिती दिल्यानंतर देशमुखांच्या वकिलांनी यासाठी वेळ मागितला आहे. खुद्द देशमुखांनी ईडीला (ED) पत्र पाठवून 7 दिवसांची मुदत मागितली आहे. आपल
वय आणि कोरोनाची परिस्थिती यामुळे चौकशीला हजर न राहण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती
देशमुखांनी ईडीकडे (ED) केली आहे. तर दुसरीकडे काल राष्ट्रवादीची बैठक झाली असून बैठकीत
देशमुख यांच्याबद्दल चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

Web Titel : Anil Deshmukh should be inquiry by ed on these 6 issues anil deshmukh is in trouble

Related Posts