IMPIMP

‘सत्य जरा जास्त टोचतं’ अमृता फडणवीसांवर भाई जगतापांचा पलटवार

by bali123
bhai jagtap on amruta fadnavis tweet allegations police accounts in axis bank

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्यात अनेक मुद्यांवरुन राज्य सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असताना दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप bhai jagtap यांच्यात वेगळाच वाद रंगला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी पोलिसांची खाती पत्नी ज्या बँकेत काम करते त्या बँकेत कशी वर्ग केली ? असा प्रश्न विचारला होता. त्यावर अमृता फडणवीस यांनी ट्विट करुन प्रत्युत्तर देताना भाई जगताप यांचा एकेरी उल्लेख केला. त्यावर आता भाई जगताप यांनी उत्तर देताना खोचक शब्दात पलटवार केला आहे. सत्य जरा जास्त टोचतं, असे भाई जगताप म्हणाले आहेत.

काय म्हणाले होते भाई जगताप ?
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर विरोधकांनी देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. देशमुख यांनी राजीनामा द्यावा यासाठी देवेंद्र फडणवीस आक्रमक झाले. फडणवीस यांना उत्तर देताना जगताप म्हणाले, माझा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सवाल आहे की त्यांनी सत्तेत असताना राज्यातील पोलिसांची खाती स्वत:च्या बायकोच्या बँकेत कशाच्या आधारावर वर्ग केली याचे उत्तर द्यावं. यावर आता अमृता फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तसेच भाई जगतापांचा एकेरी उल्लेख केला.

काय म्हणाल्या अमृता फडणवीस ?
अमृता फडणवीस यांनी ट्विट करुन भाई जगताप यांच्यावर निशाणा साधला. ‘ए भाई, तू जो कोण असशील – माझ्या वर बोट उचलायचं न्हाय ! पोलिसांची खाती तुमच्याच राज्यात तुम्ही UTI बँक/ Axis बँकला योग्यता पाहून दिली होती ! लक्षात ठेव, सरळ रस्त्याने चालणाऱ्या माणसांना डिवसायचे न्हाय !’ असे म्हटले आहे.

सत्य जरा जास्तच टोचतं
अमृता फडणवीस यांच्या ट्विटला उत्तर देताना भाई जगताप bhai jagtap म्हणाले, मला त्या ट्विटला अजिबात महत्त्व द्यायचं नाही. 2005 साली हा निर्णय आमचं सरकार असताना झाला. 16 बँकांचा त्यात प्रस्ताव होता. 2005 पासून 2017 पर्यंत त्यावर निर्णय झाला नाही. पण 2017 मध्ये अचानक अशी काय जादू झाली की अ‍ॅक्सिस बँकेकडे खाती वर्ग करण्यात आली ? ही गोष्ट खरी आहे की सत्य जरा जास्त टोचतं आणि हे सत्य आहे, असे जगताप म्हणाले.

अमृता फडणवीसांचा कालच्या ट्विटमध्ये आदरार्थी उल्लेख
दरम्यान, एकेरी उल्लेख केल्यामुळे अमृता फडणवीस यांच्यावर टीका होऊ लागल्याने मंगळवारी केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी भाई जगताप यांचा आदरार्थी उल्लेख केला आहे. मंगळवारी केलेल्या ट्विटमध्ये अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे की, जेव्हा आपण खरे असतो तेव्हा खोटे ऐकून ऐकून खराब वाटतंच. हे भाई जगतापांना कसे कळणार ? एवढे मोठे आहात – वयाने, अनुभवाने, संपत्तीने, थोडं तर खरं बोलायला शिका ! काँग्रेस, राष्ट्रवादीच्या काळातला म्हणजे तुमच्याच काळातला 2005चा हा आहे विशिष्ट आदेश !, असे त्यांनी म्हटले आहे.

Also Read :

धनंजय मुंडेंना दुसऱ्यांदा ‘कोरोना’ची लागण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी यांना देखील ‘कोरोना’ची लागण, यापूर्वीच आदित्य आढळले होते Covid-19 पॉझिटिव्ह

‘टार्गेट’ मिळाल्याची वाझेंकडून NIA कबुली? घेतले आणखी एका बड्या मंत्र्याचे नाव? महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ

‘देवेंद्र फडणवीस हे अहंकारी आणि लबाड, माझ्याकडे त्यांच्या प्रकरणांचा गठ्ठा !’

Phone Tapping : ‘काँग्रेसचा हिस्सा किती हे त्यांनी सांगावं?’

West Bengal Election 2021 : बंगालमध्ये ना TMC ना BJP ला मिळणार बहुमत, लेफ्ट-कॉंग्रेस बनणार ‘किंगमेकर’

मुंबई गुन्हे शाखेत मोठे फेरबदल ! 65 अधिकाऱ्यांची एकाचवेळी उचलबांगडी

Casting Couch : ‘काम हवं असेल तर माझ्यासोबत झोप’, अंकिता लोखंडेचा निर्मात्याबद्दल ‘खळबळजनक’ खुलासा

Related Posts