IMPIMP

Chandrakant Patil । ‘जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना हिमनगाचं टोक, बरीच मोठी यादी आहे’

by bali123
Chandrakant Patil । jarandeshwar sahkari sugar mill is just like iceberg says chandrkant patil

मुंबई न्यूज (Mumbai News) : सरकारसत्ता ऑनलाइन  कोट्यावधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी साताऱ्यातील जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना (Jarandeshwar Cooperative Sugar Factory) अंमलबजावणी संचालनालयाने (ED) जप्त केला. हा साखर कारखाना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांच्या जवळच्या निकटवर्तीयांचा आहे. यावरून आता प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना (Jarandeshwar Cooperative Sugar Factory) आणि त्यामार्फत करण्यात आलेले व्यवहार म्हणजे हिमनगाचं टोक आहे. यादी अजून बरीच मोठी आहे असं सूचक वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलं आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

200 कोटींची मालमत्ता असलेला साखर कारखाना 15 कोटींना विकला कसा?

राज्य सहकारी बँकेच्याद्वारे वेगवेगळ्या सहकारी साखर कारखान्यांना तोट्यात दाखवायचं. राज्य सहकारी बँकेने कारखाना जप्त करून तो लिलावात काढायचा. लिलाव करताना 200 ते 400 कोटींची मालमत्ता 15 ते 20 कोटींना विकायचा. मी याबाबत आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) यांनाही पत्र लिहिणार आहे. की लिलावात घेतल्या गेलेल्या सगळ्या कारखान्यांची चौकशी लावा. 200 कोटींची मालमत्ता असलेला साखर कारखाना पंधरा कोटींना विकला कसा जातो?

जो खेळखंडोबा काय चालला आहे? त्याचं उत्तर जनतेला हवं…

आधी हे सगळं करायचं मग त्याच कारखान्यावर तीनशे कोटींचं बँक लोन घ्यायचं. ज्या कारखान्याची किंमत पंधरा कोटी ठरवली त्या बँकेला पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेने (Pune District Central Bank) तीनशे कोटींचं कर्ज कसं दिलं? त्यामुळे जरंडेश्वर हे हिमनगाचं टोक आहे. मोठी यादी आहे, काही काळजी करू नका ही सगळी यादी बाहेर येणार आहे. मी कुणालाही धमकी देत नाही. माझ्या बोलण्यात कधीही धमकी नसते. परंतु, जो खेळखंडोबा काय चालला आहे? त्याचं उत्तर जनतेला हवं आहे. असं पाटील (Chandrakant Patil) म्हणाले.

ED च्या कारवाईमुळे सगळ्या गोष्टी बाहेर…

ED ने जी जप्तीची कारवाई केली त्यानंतर सगळ्याच गोष्टी समोर आल्या आहेत. हा कारखाना कुणाचा? तर शालिनीताई पाटील (Shalinitai Patil) यांचा. तो तोट्यात कसा दाखवला गेला? त्याचा लिलाव कसा झाला? लिलावात तो कोणत्या कंपनीने घेतला? त्याचे संचालक कोण? या सगळ्या गोष्टी बाहेर आल्या आहेत. हा साखर कारखाना 65 कोटींची मालमत्ता आहे. मात्र जरंडेश्वर पुरता हा विषय मर्यादित नाही. राज्य सहकारी बँकेने जे कारखाने मातीमोल किंमतीने विकले त्या सगळ्यांचा विषय आहे, असं देखील चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले.

नेमकं प्रकरण काय?

साताऱ्यातील जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यामधील (Jarandeshwar Cooperative Sugar Factory) ED ने 65 कोटी 75 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कथित 25 हजार कोटींच्या गैरव्यवहाराप्रकरणी ED ने 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, हा कारखाना अजित पवार (Ajit Pawar) आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या निकटवर्तीयांशी संबंधित असलेल्या आहे. त्यामुळे त्याच्या अडचणीत भर पडणार असल्याचं चित्र निर्माण झालं आहे.

जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यावर 2010 मध्ये 78 कोटी 90 लाखांच्या थकीत कर्जापोटी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने जप्ती आणली होती.
त्यानंतर हा कारखाना अजित पवार यांचे मावस भावाच्या कंपनीने लिलावात घेतला.
माजी आमदार आणि महसूल मंत्री शालिनीताई पाटील (Shalinitai Patil) या जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संस्थापिका आणि चेअरमनही होत्या.
16 जुलै 2010 हा कारखाना बँकेकडून लिलावात काढण्यात आला.
साखर कारखान्याचा लिलाव झाल्यानंतर अजित पवार यांचे मावस भाऊ राजेंद्रकुमार घाडगे यांच्या कंपनीने हा कारखाना विकत घेतला.
ज्यानंतर हा लिलाव हेतूपुरस्सर झाल्याचा आरोप करण्यात आला होता.

Web Titel :- Chandrakant Patil । jarandeshwar sahkari sugar mill is just like iceberg says chandrkant patil

Related Posts