IMPIMP

CM Uddhav Thackeray | काँग्रेसच्या स्वबळाच्या घोषणेवरून मुख्यमंत्री ठाकरेंनी लगावला टोला; म्हणाले…

by bali123
cm uddhav thackeray congress balasaheb thorat nana patole mahavikas aghadi

मुंबई न्यूज : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) CM Uddhav Thackeray  | राज्यात तिन्ही पक्षाचे मिळून महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) स्थापन झाले आहे. मात्र तेव्हापासून काही ना काहीतरी धुसफूस पाहायला मिळत आहे. आता तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी उघड आरोप केला आहे. मागील काही दिवसापूर्वी नाना पटोले यांनी आगामी निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढवणार असा नारा दिला. यांनतर लोणावळा बैठकीदरम्यान बोलताना पटोले यांनी मुख्यमंत्री (CM) आणि गृहमंत्री (Home Minister) आपल्यावर पाळत ठेवत असल्याचे वक्तव्य केलं आहे. तसेच, राष्ट्रवादीने (NCP) पाठीत खंजीर खुपसला असल्याचं देखील म्हटलं आहे. नाना पटोले यांच्या या वक्तव्यामुळे राज्यात चर्चेला उधाण आलं आहे. यावरून आता मुखमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. cm uddhav thackeray congress balasaheb thorat nana patole mahavikas aghadi

नाना पटोलेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री म्हणाले, ‘बाळासाहेब थोरात (‘Balasaheb Thorat) यांनी कोरोनाची भीती न बाळगता आम्हाला जेवण्यासाठी बोलवावं, आम्ही तुमच्याकडे येऊन स्वबळावर जेवू, असा प्रत्युत्तर टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.
तसेच, पुढे म्हणाले, ‘चुकीचा अर्थ काढू नका नाहीतर उद्या जेवणावरुन आघाडीत बिघाडी असं व्हायचं, पण तसं काही नाही, अशी मिश्कील प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री ठाकरे हे जलसंवर्धनाच्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा जलभूषण पुरस्काराने सन्मान कार्यक्रमादरम्यान बोलताना त्यांनी असं विधान केलं आहे.

पुढे बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ‘माझी आतापर्यंतची राजकीय कारकिर्द काँग्रेस (Congress), राष्ट्रवादीच्या (NCP) विरोधातील आहे.
जे काही कानावर पडलं ते राजकीय मतभिन्नतेचं पडलं होतं.
परंतु, याचा अर्थ विरोधक होतो म्हणून तुम्ही केलं ते सगळं वाईट असं नाही.
शिवसेनेची (Shiv Sena) अथवा शिवसेना प्रमुखांची अशी भूमिका कधीच नव्हती, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

‘माझा कोणीतरी लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला. आता तशीच पद्धत पडली आहे.
पण मीच लोकप्रिय आहे असा गैरसमज होता कामा नये.
सर्वांची कामं मिळून मुख्यमंत्र्यांना लोकप्रिय करतात. मुख्यमंत्री लोकप्रिय म्हणजे सरकार लोकप्रिय आहे.
याचा अर्थ माझं मंत्रिमंडळ योग्य काम करत आहे.
सरकार म्हणजे केवळ मंत्री नाही, सचिव, अभियंतेही आले असं उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी सांगितलं आहे.

Web Title : cm uddhav thackeray congress balasaheb thorat nana patole mahavikas aghadi

Related Posts