IMPIMP

‘कोरोना’चा कहर रोखण्यासाठी ठाकरे सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत?

by bali123
coronavirus maharashtra lockdown news thackeray government focusing work home

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्यात कोरोना (COVID-19) चा कहर दिवसेंदिवस वाढत असून त्यासाठी लागणाऱ्या आरोग्य सुविधा आणि बेड कमी पडू लागले आहेत. पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात येईल अशी शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या लॉकडाऊनमुळं आधीच जनतेला मोठा फटका बसला आहे. काहींच्या नोकऱ्या गेल्या, काहींना पगार कपात सहन करावी लागली. सर्वांनाच मोठा आर्थिक फटका एकदा सहन केला आहे. त्यामुळं आता जनतेचा लॉकडाऊनला विरोध असल्याचं दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर आता सरकार thackeray government इतर काही पर्यायांचा विचार करत आहे.

Pravin Darekar : ‘कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा?’ केंद्राने राज्यात लक्ष घालावे

‘सरकारचं वर्क फ्रॉम होम कडे विशेष लक्ष आहे’
लॉकडाऊन करण्यापेक्षा लोकांना घरून काम कसं करता येईल या दृष्टीनं सरकारचे प्रयत्न आहेत. जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम ची सोय उपलब्ध व्हावी याची चाचपणी राज्य सरकारनं सुरू केली आहे. राज्य सरकार खासगी कंपन्यांना तसे आदेश देण्याची शक्यता आहे. जर नागरिक घरात राहिले तर रस्त्यावरची गर्दी कमी होईल. ट्रेन, बस आणि मेट्रोमध्ये होणारी गर्दी टाळता येईल असा सरकारचा thackeray government विचार आहे. माहिती तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रातल्या कंपन्यांना सरकार वर्क फ्रॉम होम साठी आदेश देणार अशी चर्चा आहे. सरकारचं वर्क फ्रॉम होम कडे विशेष लक्ष आहे.

महाविकास आघाडी सरकारनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय ! खासदार उदयनराजे भोसलेंना जोरदार ‘धक्का’, जाणून घ्या

राज्यात पुन्हा लॉकडाऊन ?
आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी सांगितलं की, राज्यात तुर्तास लॉकडाऊन संदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. सध्या तरी याबाबत फक्त चर्चा सुरू आहे. याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेतील असंही त्यांनी सांगितलं. 2 एप्रिल पासून राज्यात लॉकडाऊन होणार असल्याची चर्चा होती. या चर्चा टोपे यांनी फेटाळून लावल्या आहेत.

Video : …अन् व्हिडिओ पाहताना अंगावर काटा आला : डॉ. अमोल कोल्हे

‘शेवटी जीव वाचवायचाच असेल तर लॉकडाऊन करणं भागच आहे’
राजेश टोपे असंही म्हणाले, सध्याची परिस्थिती पाहता कठोर निर्बंध लादणं गरजेचं आहे. येत्या एक दोन दिवसात या निर्बंधांची घोषणा करण्यात येईल. आम्ही लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय ठेवला आहे. शेवटी जीव वाचवायचाच असेल तर लॉकडाऊन करणं भागच आहे अशा इशाराही त्यांनी दिला आहे.

Also Read:
‘हा काळ फालतू राजकारण करण्याचा नाही, लोकांचे प्राण वाचवण्यासाठी हातात हात घालून काम करणं गरजेचं; कोरोना कुणालाही सोडत नाही’
भाजपचं पित्त का खवळतंय ?, शरद पवार-अमित शहांच्या गुप्त भेटीवरुन शिवसेनेचे शरसंधान

शिवसेनेच्या प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर ! संजय राऊत यांच्यावर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

‘महाविकास आघाडीला पुढील 25 वर्षे धोका नाही !’

पवार-शाह गुप्त बैठक ! ‘चंद्रकांत पाटील वगैरे नेते पतंगाच्या मांजावरून एवढे वर गेले की… “

‘जितेंद्र आव्हाड यांचे CDR आणि SDR जतन करा’, हायकोर्टाचे पोलिसांचा आदेश

लष्कर पेपर लिक प्रकरण : मेजर थिरु थंगवेल याला 25 लाख रुपयांच्या बदल्यात लष्कराचा पेपर पाठविला

‘आधी बुडणार्‍या रोजगाराचे पैसे बँक अकाऊंटमध्ये जमा करा, नंतरच Lockdown लावा’

‘केवळ RSS वाले तेवढे देशभक्त आणि बाकी सगळे देशद्रोही बनलेत’

एकनाथ खडसे यांनी उच्च न्यायालयात ED च्या कारवाईबद्दल दिली खळबळजनक माहिती, म्हणाले..

परमबीर सिंह यांच्या आरोपांची होणार चौकशी, निवृत्त न्यायमूर्तींच्या समितीची घोषणा

Related Posts