IMPIMP

देवेंद्र फडणवीसांचा ‘गौप्यस्फोट’; म्हणाले – ‘सचिन वाझेंना पुन्हा पदावर घेण्यासाठी उद्धव ठाकरेंनी दबाव आणला होता’

by bali123
Devendra Fadnavis's 'secret blast'; Said - 'Uddhav Thackeray had put pressure on him for police officer Sachin vaze to get back to office'

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या दक्षिण मुंबईतील अँटिलिया निवासस्थानासमोर सापडलेल्या संशयित स्कॉर्पिओ प्रकरणी आणि मनसुख हिरने मृत्यू प्रकरण (Mansukh Hiren Death Case) मुळं एनआयए नं एपीआय सचिन वाझे (Sachin Vaze) यांना अटक केली आहे. या प्रकरणी अनेक नवीन खुलासेही होताना दिसत आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सरकारविरोधात पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. यावेळी त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नावाचाही उल्लेख केला आहे. वाझेंना पुन्हा पदावर घेण्यास उद्धव ठाकरेंनी दबाव आणला होता असा आरोप फडणवीसांनी केला आहे. सचिन वाझे आणि परमबीर सिंग (Param Bir Singh) हे तर प्यादे आहेत. त्यांचे राजकीय सूत्रधार कोण आहेत याचा शोध घेतला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. नवी दिल्ली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

‘अशी घटना मुंबईच्या इतिहासात कधीच घडली नाही. रक्षकच भक्षक झालेत’
देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis म्हणाले, अंबानींच्या अँटिलिया इमारतीसमोर पोलीस अधिकाऱ्याकडूनच स्फोटकांनी भरलेली गाडी उभी केली जाते आणि त्यात मनसुख हिरेन यांची हत्या होते अशी घटना मुंबईच्या इतिहासात कधीच घडली नाही. रक्षकच भक्षक झालेत असा घणाघात फडणवीसांनी यावेळी बोलताना केला.

‘सचिन वाझे यांना पुन्हा सेवेत घेण्यास माझा विरोध होता’
देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis म्हणाले की, वसुलीच्या रॅकेटमध्ये सचिन वाझे यांचं नाव आलं होतं. असं असतानाही मी मुख्यमंत्रीपदी असताना सचिन वाझे यांची पुन्हा नियुक्ती व्हावी यासाठी उद्धव ठाकरे माझ्यासोबत बोलले होते. त्यांना पुन्हा सेवेत घेण्यास माझा विरोध होता असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. इतकंच नाही तर वाझेंना पोलीस दलात घेण्यासाठी शिवसेनेनं आपल्या दबाव आणला होता. 2018 साली मुख्यमंत्री असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सचिन वाझे यांना पुन्हा पदावर घेण्यास सांगितलं होतं परंतु मी यासाठी नकार दिला होता असंही ते म्हणाले.

‘वाझेंची नेमणूक वसुली एजंट म्हणून केली, डान्स बार चालवण्याची सूट देत वसुली’
पुढं बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, सिचन वाझे यांचे शिवसेने सोबत अतिशय जवळचे संबंध होते. एवढंच नाही तर अनेक नेत्यांसोबत त्यांचे व्यवसायिक संबंध देखील होते. सचिन वाझे खंडणीच्या गुन्ह्यात सापडलेले असतानाही त्यांना पदावर घेतलं गेलं. वाझेंना पदावर घेत क्राईम इंटेलिजन्स युनिटमधील दोन पोलीस निरीक्षकांची बदली केली आणि वाझे यांना प्रमुख केलं. वाझे गृहमंत्री, शिवसेनेच्या नेत्यांसोबत कायम दिसून आले. वाझेंची नेमणूक ही वसुली एजंट म्हणून केली गेली. यातूनच मुंबईत डान्स बार चालवण्याची सूट देत वसुली करण्यात आली असा आरोप फडणवीसांनी केला आहे.

‘हिरेन-वाझे यांच्या संभाषणाची महत्त्वाची आडिओ क्लीप एटीएस व एनआयएकडे’
फडणवीस असंही म्हणाले, सचिन वाझे हे मनसुख हिरेन यांना ओळखत होते. स्फोटकांसाठी वापरण्यात आलेली स्कॉर्पिओ वाझेंनी मनसुख हिरेन यांच्याकडून घेतली होती. गाडी घेऊन वाझेंनी पैसे दिले नाहीत. स्कॉर्पिओ मध्ये स्फोटकं आढळून आल्यानंतर वाझेच मनसुख हिरेन यांची चौकशी करत होते. मनसुख यांची हत्या करून त्यांचा मृतदेह हा खाडीत फेकला गेला. आता या प्रकरणात वेगवेगळे दावे केले जात आहेत. पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहता मनसुख हिरेन यांची हत्याच झाली आहे. मनसुख हिरेन हत्या प्रकरणी एवढे पुरावे असूनही पुढं कुठलीच कारवाई होत नाहीये. खरं तर एटीएसनं वाझेंना अटक करायला हवी होती. एटीएस आणि एनआयए यांच्याकडे मनसुख हिरेन आणि वाझे यांच्यातील संभाषणाची एक महत्त्वाची आडिओ क्लीप आहे. त्यामुळं आता कारमधील स्फोटकं प्रकरणी आणि मनसुख हिरेन हत्ये प्रकरणी दोन्हींचा एकत्रित तपास एनआयएनं करावा अशी मागणीही फडणवीसांनी केली.

‘वाझे-परमबीर सिंग तर प्यादे, त्यांच्या राजकीय सूत्रधारांची चौकशी झाली पाहिजे’
देवेंद्र फडणवीस म्हणाले, स्फोटकं आढळून येणं आणि हत्या होणं हे राज्य सरकारचं अपयश आहे. अधिकाऱ्यांची पार्श्वभूमी माहिती असूनही त्यांना पदावर का घेतलं. एवढंच नाही तर त्या विभागाचा प्रमुख म्हणून नेमलं गेलं. यावरून सरकारच्या भूमिकेवरच संशय निर्माण होत आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सचिन वाझे यांची पाठराखण करताना दिसले. सचिन वाझे आणि परमबीर सिंग हे तर प्यादे आहेत. त्यांच्या राजकीय सूत्रधारांची चौकशी झाली पाहिजे. वाझेंना ऑपरेट करणाऱ्या पॉलिटीकल बॉसेसचा तपास केला पाहिजे अशी मागणी फडणवीसांनी केली. मुंबईत बेटींगचं जे रॅकेट आहे त्याच्याशीही सचिन वाझेचा काही ना काही संबंध होता असा आरोपही फडणवीसांनी केला आहे.

Amol Kolhe : इंद्रायणी मेडीसिटी प्रकल्पाला विशेष निधी द्या ; खा.डॉ.अमोल कोल्हेंची केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे मागणी ! लोकसभेत केलं अभ्यासपूर्ण भाषण (Video)

भाजप नेत्याचा सवाल, म्हणाले – ‘मुख्यमंत्री ठाकरे वाझेंसाठी इतक्या बैठका का घेतायत?’

शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

‘देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालतायेत? गुन्ह्यात सहभागी होऊ नका’, काँग्रेस नेत्याचं विधान

काँग्रेस नेत्याचे शरद पवारांना पत्र पाठवून आवाहन, म्हणाले – ‘पवार साहेब, प्रचाराला येऊ नका, लोकांचा गोंधळ उडेल’

Related Posts