IMPIMP

शिवसेनेच्या खेळीनं भाजपला दुसरा धक्का ! माजी आमदार नितीन पाटील यांनी बांधलं ‘शिवबंधन’

by bali123
ex mla nitin patil join shiv sena

औरंगाबाद : सरकारसत्ता ऑनलाइन – जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष माजी आमदार नितीन पाटील (Nitin Patil) यांनी गुरुवारी (दि 1 एप्रिल) मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर आता जिल्हा बँकेवर शिवसेनेचंच वर्चस्व राहणार हे स्पष्ट झालं आहे. नितीन पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश झाल्यानं अब्दुल सत्तार (Abdul Sattar), संदीपान भुमरे (Sandipanrao Bhumre), अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी जिल्हा बँकेत भाजपला दुसरा धक्का दिला अशी चर्चा आहे. यापूर्वी माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे (Haribhau Bagade) यांच्या पराभवानं भाजपला पहिला धक्का बसला आहे.

‘जेटली आणि सुषमा स्वराज यांचा मृत्यू मोदींनी केलेल्या छळामुळेच’ – द्रमुक नेत्याचे विधान

‘…म्हणून नितीन पाटील यांनाच शिवसेनेत घेण्यात आलं’
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे मंत्री संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार आणि आमदार अंबादास दानवे यांनी भाजपला सोबत घेत शेतकरी विकास पॅनल तयार केलं होतं. नितीन पाटील हे भाजपमध्ये असल्यानं त्यांना अध्यक्ष कसं करायचं असा प्रश्न होता. यावर नितीन पाटील यांनाच शिवसेनेत घेण्यात आलं. गुरुवारी (दि 1) नितीन पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवबंधन बांधून घेतलं. आता जिल्हा बँकेचा अध्यक्ष शिवसेनेचाच होणार एवढं मात्र निश्चित आहे.

नितीन पाटील nitin patil यांच्या पक्षप्रवेशावेळी पालकमंत्री सुभाष देसाई, संदीपान भुमरे, महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार, आमदार अंबादास दानवे, कृष्णा पाटील डोणगावकर यांची उपस्थिती होती.

‘हे पाय जमीनीवरचे… मातीचा टिळा भाळी, पायात आहे महाराष्ट्राच्या प्रेमाचं रक्त, सह्याद्रीचा हा चिरा भक्कम आहे’ ! कार्यकर्त्यांच्या शरद पवरांबद्दलच्या भावना

‘सत्तार-भुमरे’ या जोडीच्या डोक्यात मात्र वेगळंच सुरू होतं, नितीन पाटील यांच्या शिवसेना प्रवेशानं ते सिद्ध झालंय
औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहाकरी बँकेच्या निवडणुकीत शिवसेनेनं राज्याच्या सत्तेत असलेल्या काँग्रेसला बाजूला सारत विरोधी पक्ष असलेल्या भाजपला सोबत घेतले होते. त्यावरून शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी शिवसेनेचे मंत्री संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, आमदार अंबादास दानवे यांच्यावर निशाणा साधला होता. मुख्यमंत्र्यांना त्रास देणाऱ्या भाजपला सोबत का घेतलं ? असा सवाल करत चंद्रकांत खैरे यांनी थेट काँग्रेसच्या पॅनलचा प्रचार केला होता. परंतु शिवसेनेनं भाजपला सोबत घेऊन तयार केलेल्या शेतकरी विकास पॅनलनं सर्वाधिक जागा जिंकत बहुमत मिळवलं होतं. निवडणुकीआधी सत्तार, बागडे, भुमरे या पॅनलच्या प्रमुख नेत्यांनी नितीन पाटील हेच जिल्हा बँकेचे अध्यक्ष असतील असं जाहीर केलं होतं. निकाल लागला तेव्हा भाजपचे हरिभाऊ बागडे हे पराभूत झाले. अध्यक्षपद आता निवडून आलेले संचालकच ठरवतील अशी भूमिका शिवसेनेनं घेतली. त्यामुळं साहजिकच नितीन पाटील बेचैन होते. परंतु सत्तार-भुमरे या जोडीच्या डोक्यात मात्र वेगळंच सुरू होतं. नितीन पाटील यांच्या शिवसेना प्रवेशानं ते सिद्ध झालं आहे.

Also Read:

Video : किरीट सोमय्यांचा जितेंद्र आव्हाडांवर गंभीर आरोप, म्हणाले-‘गृहनिर्माण खात्यातही मोठी ‘वाझे’ गँग, 100 रुपये प्रती स्क्वेअर फूटाचा भाव’

‘कोरोना’चा कहर रोखण्यासाठी ठाकरे सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत?

‘तुम्ही शरद पवारांचे प्रवक्ते आहात का?’ राऊत यांचं ‘रोखठोक’ उत्तर, म्हणाले – ‘राहुल गांधींची ‘पप्पू’ म्हणून टिंगल केली, त्यावेळी ही मंडळी कुठे होती’

 

‘कोरोना’च्या नावाखाली सुरु असलेला ‘तमाशा’ बंद करा; काँग्रेसच्या नेत्याचे वक्तव्य

Video : …अन् व्हिडिओ पाहताना अंगावर काटा आला : डॉ. अमोल कोल्हे

‘हा काळ फालतू राजकारण करण्याचा नाही, लोकांचे प्राण वाचवण्यासाठी हातात हात घालून काम करणं गरजेचं; कोरोना कुणालाही सोडत नाही’

Related Posts