IMPIMP

‘जेटली आणि सुषमा स्वराज यांचा मृत्यू मोदींनी केलेल्या छळामुळेच’ – द्रमुक नेत्याचे विधान

by bali123
udhayanidhi stalin says sushma swaraj arun jaitley died due to narendra modis torture

नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली आणि सुषमा स्वराज या दोन नेत्यांच्या मृत्यूवरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी narendra modi यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आला आहे. ‘सुषमा स्वराज नावाची एक व्यक्ती होती. मोदींनी टाकलेल्या दबावामुळेच त्यांचा मृत्यू झाला. अरुण जेटली नावाचीही एक व्यक्ती होती. मोदींनी केलेल्या छळामुळेच त्यांचा मृत्यू झाला’, असा आरोप द्रमुकचे उदयनिधी स्टॅलिन यांनी केला आहे.

‘हे पाय जमीनीवरचे… मातीचा टिळा भाळी, पायात आहे महाराष्ट्राच्या प्रेमाचं रक्त, सह्याद्रीचा हा चिरा भक्कम आहे’ ! कार्यकर्त्यांच्या शरद पवरांबद्दलच्या भावना

देशातील पाच राज्यांत विधानसभा निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी प्रचारसभाही घेतल्या जात आहेत. सत्ताधारी-विरोधकांकडून आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. त्यातच द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी पंतप्रधान मोदींवर narendra modi गंभीर आरोप केला आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले, की ‘अरुण जेटली नावाची एक व्यक्ती होती. मोदींनी केलेल्या छळामुळेच त्यांचा मृत्यू झाला. तसेच सुषमा स्वराज नावाचीही एक व्यक्ती होती. मोदींनी टाकलेल्या दबावामुळेच त्यांचा मृत्यू झाला’. तसेच पंतप्रधान मोदींनी वेंकय्या नायडू यांच्यासारख्या भाजपमधील ज्येष्ठ नेत्यांना बाजूला सारत आहेत, असेही ते म्हणाले.

दरम्यान, मोदींनी narendra modi केलेल्या विधानसभा निवडणुकीचे तिकीट मिळवण्यासाठी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना डावलले जात असल्याच्या टीकेला उत्तर उदयनिधी स्टॅलिन udhayanidhi stalin यांनी दिले. हे उत्तर देताना त्यांनी हा गंभीर आरोप केला आहे. उदयनिधी यांच्या या वक्तव्यामुळे मोठा वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.

Great ! ‘मला अभिमान आहे, 17 लाख कोटींच्या कामात एकही भ्रष्टाचाराची तक्रार नाही’ – नितीन गडकरी (व्हिडीओ)

तुमच्या वक्तव्याने आम्ही दुखावलो : बांसुरी स्वराज
‘उदयनिधीजी, udhayanidhi stalin कृपया माझ्या आईच्या आठवणींचा वापर तुमच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी करु नका. तुमचे वक्तव्य चुकीचे आहे. मोदींनी माझ्या आईला नेहमी आदर आणि सन्मान दिला. आमच्या कठीण काळात पंतप्रधान narendra modi आणि पक्ष आमच्या बाजूने खंबीरपणे उभे राहिले. तुमच्या वक्तव्याने आम्ही दुखावलो आहोत’, असे ट्विट बांसुरी स्वराज यांनी केले आहे.

Also Read:

Video : किरीट सोमय्यांचा जितेंद्र आव्हाडांवर गंभीर आरोप, म्हणाले-‘गृहनिर्माण खात्यातही मोठी ‘वाझे’ गँग, 100 रुपये प्रती स्क्वेअर फूटाचा भाव’

‘कोरोना’चा कहर रोखण्यासाठी ठाकरे सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत?

 

‘तुम्ही शरद पवारांचे प्रवक्ते आहात का?’ राऊत यांचं ‘रोखठोक’ उत्तर, म्हणाले – ‘राहुल गांधींची ‘पप्पू’ म्हणून टिंगल केली, त्यावेळी ही मंडळी कुठे होती’

 

‘कोरोना’च्या नावाखाली सुरु असलेला ‘तमाशा’ बंद करा; काँग्रेसच्या नेत्याचे वक्तव्य

 

Video : …अन् व्हिडिओ पाहताना अंगावर काटा आला : डॉ. अमोल कोल्हे

 

‘हा काळ फालतू राजकारण करण्याचा नाही, लोकांचे प्राण वाचवण्यासाठी हातात हात घालून काम करणं गरजेचं; कोरोना कुणालाही सोडत नाही’

Related Posts