IMPIMP

राज्यातील काँग्रेसचा ‘हा’ बडा नेता उद्या भाजपात प्रवेश करणार

by bali123
Maharashtra Politics | rohit tilak may be way towards bjp chandrakant patil pune political news politics

मुंबई न्यूज (Mumbai News) : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) काँग्रेस (Congress) पक्षातून सातत्याने कोण तरी नेता रामराम करून दुसऱ्या पक्षात प्रवेश करताना दिसत आहे. त्यामुळे आहे ते काँग्रेसचं पारडं आणखी खाली जाताना दिसत आहे. मागील काही काळामध्ये काँग्रेसचे असणाऱ्या बड्या नेत्यांनी म्हणजे ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Shinde), जितिन प्रसाद (Jitin Prasad) यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. तसेच, मुंबईतील एक बडा नेता आता भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आलीय. यामुळे काँग्रेसला एक मोठा झटका बसला आहे. काँग्रेसचे मुंबईतील माजी नेते तसेच राज्य सरकारमधील माजी मंत्री कृपाशंकर सिंह (Kripashankar Singh) यांनी काँग्रेसला रामराम केले आहे. राजीनाम्यानंतर आता भाजपाचे (BJP) कमळ हाती घेणार असल्याचे समजते. (Big blow to Congress; Kripashankar Singh joins BJP tomorrow)

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

माजी मंत्री कृपाशंकर सिंह (Kripashankar Singh) हे मुंबई काँग्रेसमधील (Congress) उत्तर भारतीय नेत्यांपैकी ते एक नेते आहेत. सिंह हे काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर बऱ्याच काळानंतर भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश करणार आहेत. उद्या (बुधवारी) दुपारी 12 वाजता भाजपाच्या प्रदेश कार्यालया येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत कृपाशंकर सिंह यांचा भाजपामध्ये प्रवेश होणार आहे. कृपाशंकर सिंह हे मागील काही काळापासून पक्षीय राजकारणात फारसे सक्रिय नव्हते. यानंतर सिंह हे उद्या भाजपचा झेंडा हाती घेणार असल्याची माहिती समोर आलीय.

दरम्यान, कृपाशंकर सिंह हे मुंबईतील कालिना विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले होते. तसेच त्यांनी काही काळ राज्याचे गृहराज्यमंत्रिपदही सांभाळले होते. त्याबरोबरच यांनी मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षपदही सांभाळले होते. सिंह यांनी जम्मू-काशमीरमध्ये कलम 370 रद्द करण्याला काँग्रेस पक्षाने विरोध केल्याचे निमित्त साधून 2019 मध्ये काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. परंतु, तेव्हापासून ते कुठल्याही पक्षाशी संलग्न नव्हते. राजकरणात ते सक्रिय नव्हते. मात्र ते लवकरच भाजपाच प्रवेश करतील असं म्हटलं जात आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील कृपाशंकर सिंह हे लवकरच भाजपात प्रवेश करतील, असं संकेत दिले होते.

Web Titel : Kripashankar Singh | big blow congress former congress leader kripashankar singh will join bjp tomorrow

Related Posts