IMPIMP

Sanjay Raut : ‘देशात Lockdown लावा महाराष्ट्रात नाही, असं फडणवीस मोदींना म्हणतील का?’

by Team Deccan Express
Sanjay Raut on Devendra Fadnavis | Shivsena MP and leader sanjay raut there should be a mercedes for marathi people but not for hard work and theft

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांच्या संख्ये वेगाने वाढ होत असल्याने परिस्थिती बिकट होत असल्याचे पहायला मिळत आहे. विक्रमी संख्येने रुग्ण वाढ होत असल्याने याचा परिणाम आरोग्य व्यवस्थेवर होत असून प्रचंड ताण पडत आहे. कोरोना औषधांसह बेड, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन तुटवड्याचा प्रश्न निर्माण होत असल्याने राज्य सरकारने लॉकडाऊनचा विचार सुरु केला आहे. मात्र, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्याला नकारार्थी सूर लावला आहे. यावरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत sanjay raut यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीस यांना टोला लगावला आहे.

‘फडणवीसांच्या काळात 14 मंत्र्यांवर गंभीर आरोप होऊनही नैतिकतेनं सत्तेशी जणू ‘लव्ह जिहाद’ पुकारला होता’, संजय राऊतांचा टोला

आज सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी देशातील आणि राज्यातील परिस्थितीकडे लक्ष वेधून विरोधकांवर टीका केली आहे. राऊत sanjay raut म्हणाले, देशात लॉकडाऊनची गरज आहे की, नाही याचा निर्णय पंतप्रधान घेतील. पण काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व पक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. त्यांच्यासोबत चर्चा केली. त्यांचे मुद्दे लक्षात घेतले. लॉकडाऊनची गरज असल्याचे त्यांनी संकेत दिले आहे. जर केंद्राला वाटलं की, लॉकडाऊनची गरज आहे, तर पंतप्रधान हे मन की बात मधून देशाला सांगितली. पण मला वाटतं पश्चिम बंगालच्या निवडणूका संपल्यानंतर मोदी यावर निर्णय घेतील. मात्र, लसीचे जास्तीत जास्त लसींचे डोस राज्यांना दिले पाहिजेत. लोकांच्या जीवाचं रक्षण करणाऱ्या लसींचा आणि औषधांचा गैरवापर होऊ नये. गुजरातबद्दल जास्त प्रेम वाटत असेल, तर ठिक आहे, पण संपूर्ण देश तुमचा आहे, अशी टीका राऊत sanjay raut यांनी केली.

गुजरात भाजप ऑफिसमधून रेमडेसिवीर इंजेक्शनचे मोफत वाटप, नवाब मलिकांचा गंभीर आरोप

जावडेकर दिल्लीत बसून ज्ञानामृत देत आहेत
यावेळी संजय राऊत यांनी प्रकाश जावडेकर यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, प्रकाश जावडेकर

दिल्लीत बसून जे ज्ञानामृत देत आहेत, त्याची राज्याला गरज नाही. त्यांनी महाराष्ट्रात यावं, मुंबई-पुण्यात बसावं, इथली परिस्थिती बघावी, अशी टीका राऊत sanjay raut यांनी केली. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील लॉकडाऊनला विरोध केला आहे. ती त्यांच्या पक्षाची राज्यापुरती भूमिका आहे. देशातील भूमिका वेगळी असू शकते. जर मोदींनी देशात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला तर, देवेंद्र फडणवीस मोदींना म्हणतील का की महाराष्ट्र सोडून देशभरात लॉकडाऊन करा. अशा परिस्थितीमध्ये राजकारण करणे कोणालाही शोभत नाही. लोकांचे जीव वाचवणे महत्त्वाचे आहे, अशी भूमिक राऊत sanjay raut यांनी मांडली.

Read More : 

सचिन वाझे प्रकरणावरुनही उदयनराजे आक्रमक, म्हणाले, ‘हा कोण वाझे…’

संजय राऊतांनी फडणवीसांना दिला सल्ला, म्हणाले – ‘प्रसंग बाका, सरकार कोणाचं हे पाहू नका, दिल्लीतून महाराष्ट्राला मदत मिळवून द्या’

15 लाखांची लाच घेताना आयकर विभागातील 2 अधिकारी CBI च्या जाळ्यात

Balasaheb Thorat : ‘राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या आरोपांना महत्व देत नाही’

राज्यात 30 एप्रिलपर्यंत संपूर्ण Lockdown ? मुख्यमंत्र्यांनी बोलाविलेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर
होऊ शकतो निर्णय

खा. विनायक राऊतांचा राणेंवर ‘निशाणा’, म्हणाले – ‘कोकण सम्राटां’ नी चिपी विमानतळाचं कंत्राट दळभद्री कंपनीला देऊन वाट लावली

Related Posts