IMPIMP

Modi Cabinet Expansion | मोदी मंत्रिमंडळात नारायण राणे, डॉ. भारती पवार, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंह यांच्यासह 43 जणांचा समावेश

by bali123
Modi Cabinet Expansion | In the Modi cabinet, Narayan Rane, Dr. Including Bharti Pawar and 43 others

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Modi Cabinet Expansion | मोदी मंत्रिमंडळाचा आज (बुधवार) सायंकाळी 6 वाजता विस्तार होणार आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातून नारायण राणे, डॉ. भारती पवार, डॉ. भागवत कराड आणि कपिल पाटील यांची वर्णी लागली आहे. एकुण 43 मंत्री शपथ घेणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामध्ये अनेक दिग्गज नेत्यांचा समवेश आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

महाराष्ट्रातून कोणाची वर्णी लागणार आता या चर्चेला पुर्णविराम मिळाला आहे. शिवसेनेला शह देण्यासाठी नारायण राणे यांना भाजप मंत्रिपद देणार असल्याची चर्चा होती. अखेर आता नारायण राणे यांचा मोदींच्या मंत्रिमंडळात समावेश होणार हे निश्चित झाले आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंह यांचा देखील मोदी मंत्रिमंडळात समावेश होत आहे. डॉ. सत्यपाल सिंह हे देखील आज संध्याकाळी 6 वाजता मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

Web Title :  Modi Cabinet Expansion | In the Modi cabinet, Narayan Rane, Dr. Including Bharti Pawar and 43 others

Related Posts