IMPIMP

Modi Cabinet Expansion | PM मोदींचे सर्व कार्यक्रम रद्द, मंत्रिपदासाठी ‘ही’ संभाव्य यादी तयार; महाराष्ट्रातून ‘या’ नेत्यांची नावं

by bali123
Modi Government | electric vehicles registration fee and rc fee waived off by central govt

नवी दिल्ली : वृत्तसंस्था केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार (Modi Cabinet Expansion) येत्या दोन ते तीन दिवसांत होण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील हालचालींना आता वेग आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये (Modi Cabinet Expansion) कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, नव्या मंत्र्यांची यादी जवळपास अंतिम झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी गुरुवारपर्यंत सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. ज्या नेत्यांच्या नावाची मंत्रिपदासाठी चर्चा आहे. त्या काही नेत्यांना फोन करुन दिल्ली येण्यास सांगितले आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

हे नेते दिल्लीकडे रवाना

महाराष्ट्रातून नारायण राणे (Narayan Rane), आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनवाल यांना दिल्लीत बोलावण्यात आले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आज संध्याकाळपर्यंत दिल्लीत पोहचणार आहेत. जे.पी. नड्डा सध्या हिमाचल प्रदेशमध्ये आहेत. ज्योतिरादित्य शिंदे हे देखील इंदूरहून दिल्लीला रवाना झाले आहेत. आगामी वर्षामध्ये ज्या राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या राज्यातील नेत्यांना या मंत्रिमंडळ विस्तारात प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्तारामुळे सद्य मंत्र्यांचा अतिरिक्त भार हलका होणार आहे.

सध्याच्या मंत्रिमंडळात 53 मंत्री

केंद्रीय मंत्रिमंडळात 81 सदस्यांचा समवेश करता येऊ शकतो. सध्या केंद्रात 53 मंत्री आहेत. त्यामुळे आणखी 28 जणांना मंत्रिपदाची लॉटरी लागू शकते. मंत्र्यांच्या नावाची अंतिम यादी तयार झाली असून यामध्ये कोणत्या नेत्याची मंत्रिपदी वर्णी लागणार हे पहाणं गरजेचं आहे. पुढील वर्षी ज्या राज्यात निवडणुका होणार आहेत. तेथील कोणत्या नेत्याची मंत्रिपदी वर्णी लागणार याकडे लक्ष लागले आहे.

या तीन नेत्यांना मंत्रीपद मिळणार ?

मध्य प्रदेशात कमलनाथ सरकार पाडण्यात ज्योतिरादित्य शिंदे यांची महत्त्वाची भूमिका होती. त्यामुळे ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह सर्वानंद सोनोवाल आणि वरुण गांधी या तीन नेत्यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे. मोदींच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Shinde) यांचा समवेश नक्की असल्याची चर्चा आहे.

अंतर्गत वाद मिटवण्यासाठी सोनोवाल यांना मंत्रिपद

आसामध्ये सोनोवाल यांनी हिमंता बिस्वा यांच्यासाठी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. यानंतर सोनोवाल यांना दिल्लीत बोलवण्यात येणार असल्याची चर्चा होती. आसाममधील भाजपमध्ये (BJP) असलेले अंतर्गत वाद मिटवण्यासाठी सोनोवाल यांचा मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय भाजपमधील आक्रमक चेहरा असलेल्या वरुण गांधी यांचा देखील मंत्रिमंडळात समावेश केला जाण्याची शक्यता आहे.

बिहारमधून सुशील कुमार मोदींचे नाव चर्चेत

बिहारमधून माजी मुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे नाव चर्चेत आहे. तर मागील वर्षी लोक जनशक्ती पार्टीचे रामविलास पासवान यांचे निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर पक्षामध्ये दोन गट तयार झाले होते. पासवान यांचे चिरंजीव चिराग पासवान आणि पशुपति पारस यांच्या मतभेद झाले. यामुळे पशुपति पारस यांना मंत्रिमंडळात घेतले जाईल अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

प.बंगालमधून त्रिवेदी तर ओडिसातून पांडा

मनमोहन सिंह सरकारमध्ये रेल्वे मंत्री पदाची धुरा सांभाळणारे दिनेश त्रिवेदी यांनी पश्चिम बंगाल निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे त्रिवेदी यांचे नाव चर्चेत आहे. तर दुसरीकडे ओडिसा मधून बैजयंत पांडा यांना देखील केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळणार असल्याचे बोललं जात आहे.

महाराष्ट्रातील दोन नेत्यांची नावे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारामध्ये महाराष्ट्रातून भाजपचे ज्येष्ठ नेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या प्रीतम मुंडे (Pritam Munde) याची देखील मंत्रिमंडळ विस्तारात वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्यांनी बीडमधून निवडणूक लढवली होती. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत प्रीतम मुंडे यांनी 7 लाखांच्या फरकाने विजय मिळवला होता. याशिवाय महाराष्ट्रातून नारायण राणे यांचेही नाव चर्चेत आहे. नारायण राणे यांना दिल्लीतून फोन आला असून केंद्रीय कॅबिनेटमध्ये त्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

कॅबिनेट बैठक रद्द

केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये फेरबदल होणार असल्याची चर्चा आहे. याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी संध्याकाळी पाच वाजता बैठक बोलावली होती. या बैठकीला भाजपचे ज्येष्ठ मंत्री आणि भाजप
अध्यक्ष उपस्थित राहणार होते. परंतु ही बैठक रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या
कॅबिनेटमध्ये कोणत्या नेत्याची मंत्रिपदावर वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Titel : modi cabinet expansion jyotiraditya scindia narayan rane probable candidates union ministers

Related Posts