IMPIMP

Modi Government | मोदी सरकारची मोठी घोषणा ! MSME च्या कक्षेत होणार रिटेलर्स आणि होलसेल व्यापार्‍यांचा समावेश; पीएम मोदी म्हणाले – ‘ऐतिहासिक निर्णय’

by bali123
PM Narendra Modi | pm narendra modi likely visit pune in end december

नवी दिल्ली : वृत्तसंस्था मोदी सरकार (Modi Government) ने रिटेलर्स आणि होलसेल व्यापार्‍यांचा (Retail and Wholesale Trade) सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाच्या (MSME) कक्षेत समावेश केला आहे. कोरोना व्हायरस महामारी (Corona Pandemic) मुळे देशातील किरकोळ आणि घाऊक व्यापार्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे, यातून सावरण्यासाठी मोदी सरकारने (Modi Government) हा निर्णय घेतला आहे. या निर्णयास (PM Modi) यांनी ऐतिहासिक म्हटले आहे. modi government has taken a landmark step of including retail and wholesale trade as msme

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

पंतप्रधानांनी शनिवारी ट्विट करत म्हटले की, आमच्या सरकारने किरकोळ आणि घाऊक व्यापार्‍यांना एमएसएमईमध्ये समावेश करण्याचे एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे.
यामुळे कोट्यवधी व्यापार्‍यांना सहजपणे कर्ज मिळण्यास मदत होईल.
त्यांना इतर अनेक लाभ मिळतील आणि त्यांच्या व्यापाराला प्रोत्साहन मिळेल.
आम्ही आपल्या व्यापार्‍यांना सशक्त बनवण्यासाठी प्रतिबद्ध आहोत.

नितिन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केली होती घोषणा

MSME मंत्री नितिन गडकरी (Nitin Gadkari) यांनी शुक्रवारी एक ट्विट करून यासंदर्भात घोषणा करत म्हटले होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात आम्ही एमएसएमई मजबूत बनवण्यासाठी प्रतिबद्ध आहोत.
यामध्ये आपल्याला इकॉनॉमिक ग्रोथमध्ये (Economic growth) मदत मिळेल.

यासंदर्भातील सरकारच्या सुधारित गाईडलाइन्समुळे अडीच कोटी रिटेल आणि होलसेल व्यापार्‍यांना फायदा होईल.
सोबतच त्यांनी हे सुद्धा म्हटले की, कोरोना महामारीच्या दुसर्‍या लाटेमुळे आलेल्या अडचणी पाहता हा निर्णय घेतला आहे.

निर्णयावर व्यापारी संघटना खुश

किरकोळ आणि घाऊक व्यापाराला सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रमाच्या (MSME) कक्षेत आणण्याच्या सरकारच्या निर्णयाला व्यापारी संघटनांनी ऐतिहासिक म्हटले आहे आणि आनंद व्यक्त केला आहे.

रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडिया (RAI) ने म्हटले की, MSME ला आपला बचाव, विकास तसेच पुढे जाण्यासाठी आवश्यक समर्थन मिळेल.
तर, कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) ने म्हटले की, या निर्णयानंतर व्यापारी एमएसएमईच्या कक्षेत येतील आणि त्यांना बँका तसेच आर्थिक संस्थांकडून प्राधान्य असलेल्या क्षेत्रात कर्ज मिळवण्यात मदत होईल.

Web Title : modi government has taken a landmark step of including retail and wholesale trade as msme

Related Posts