IMPIMP

Nana Patole । नाना पटोलेंचे विधानसभेत गंभीर आरोप; म्हणाले – ‘माझा फोन टॅप केला आणि नाव ठेवलं अमजद खान’

by bali123
Nana Patole । congress chief nana patole alleges phone tapping name amjad raosaheb danve pa sanjay kakade

मुंबई न्यूज (Mumbai News) : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) Nana Patole । राज्यात दोन दिवसीय सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशना दरम्यान बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी फोन टॅपिंगसंदर्भात भाष्य केलं आहे. त्यावेळी त्यांनी फोन टॅपिंगसंदर्भात गंभीर आरोप देखील केले आहेत, 2016- 17 रोजी माझा फोन टॅप (Tap the phone) करण्यात आला. मी खासदार होतो, त्यामुळे माझ्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचं काही कारण नव्हतं. पण माझा फोन टॅप केला आणि माझं नाव ठेवलं गेलं ‘अमजद खान’, असं नाना पटोले म्हणाले. आपल्यासोबतच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे PA, तसेच खासदार संजय काकडे यांचाही फोन टॅप करण्यात आला असल्याचा आरोप पटोले (Nana Patole) यांनी केलाय.

काय म्हणाले नाना पटोले ?

नाना पटोले (Nana Patole) बोलताना म्हणाले, ‘केंद्रातले सध्याचे मंत्री दानवे यांच्या पीएचा नंबर देखील टॅप केला गेला. खासदार संजय काकडेंचा नंबर टॅप केला गेला. अशी खूप नावं आहेत. त्यांच्याच लोकांचेही फोन टॅप (Tap the phone) केले गेले. कुणाचीही गोपनीयता भंग करण्याचा अधिकार कुणालाही नाही. धर्मातही हेच म्हटलं आहे की कुणाच्या गोष्टी आपण ऐकल्या तर ते पाप असतं. आता सुसंस्कृत लोकं असं राजकारण करत असतील तर माहिती नाही. तसेच, आपल्याला मुसलमानांचंच नाव (अमजद खान) का टाकलं? यावर पटोले यांनी आक्षेप घेतला. “मुसलमानांचीच नावं का टाकली? सरळ माझंच नाव टाकायला हवं होतं. या पद्धतीने हिंदू-मुस्लिमांमध्ये वाद निर्माण करून धर्माच्या नावाने राजकारण करून राज्य पेटवायचं हा उद्देश होता का? असा कडकडीत सवाल देखील पटोले यांनी केला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

पुढे नाना पटोले म्हणाले, ‘हे फोन टॅपिंग करण्याची गरज काय? याच्यामागे कोण आहे? 2017-18 च्या काळात पुणे पोलीस आयुक्तांच्या माध्यमातून हे फोन टॅप केले गेले. कुणाच्या आदेशाने हे झाले? साखर कारखान्यांबद्दल तक्रारींची मोहीम सुरू आहे. गडकरी साहेबांची देखील तक्रार केली आहे. त्यांचेच लोक आता पत्र देत आहेत. या सर्व गोष्टींची माहिती गृहमंत्र्यांनी आम्हाला द्यावी. आमच्यावर आरोप लावले की ही व्यक्ती कोणतंही काम, व्यवसाय करत नाही. अंमली पदार्थांची तस्करी करत आहे. हे माझ्यावरच नाही, तर जितक्या लोकांचे फोन टॅप झाले, त्यांच्यावर हा आरोप करण्यात आला. असं पटोले म्हणाले.

दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नाना पटोले (Nana Patole) यांनी यावेळी बोलताना फोन टॅपिंगसंदर्भात गंभीर आरोप केले आहेत.
तसेच, पुढे ते म्हणाले, किती लोकांचे, कुणाचे फोन टॅप केले गेले याची माहिती हवी. याचे सूत्रधार कोण आहेत? याला शासनाची मान्यता घ्यावी लागते, अशी मागणी देखील नाना पटोले यांनी अधिवेशना दरम्यान केली आहे.

Web Title : Nana Patole । congress chief nana patole alleges phone tapping name amjad raosaheb danve pa sanjay kakade

Related Posts