IMPIMP

नाना पटोलेंच्या ‘त्या’ विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ, राष्ट्रवादी आणि अजित पवारांसाठी धोक्याची घंटा?

by Team Deccan Express
Maharashtra Politics News | ncp ajit pawar answer congress nana patole allegations of alliance with bjp

इंदापूर : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मित्र पक्ष असले तरी ते एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. काही महिन्यापूर्वी राज्याच्या राजकारणात काँग्रेने फेरबदल करुन नाना पटोले Nana Patole यांच्याकडे प्रदेशाध्यपद दिले. त्यानंतर पटोले Nana Patole यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्यात तीन पक्षांचे सरकार असले तरी काँग्रेसच्या राज्यातील अस्तित्वाबाबत शंका उपस्थित केली जात आहे. मात्र आता नाना पटोले यांनी गुरुवारी इंदापूरमध्ये केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून अजित पवार आणि राष्टवादीचे टेन्शन वाढले आहे.

पंढरपूर-मंगळवेढ्यात प्रचाराच्या तोफा थंडावल्या ! अखेरच्या दिवशी भाजपची एकही प्रचारसभा नाही, उद्या मतदान

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार संपवून नाना पटोले Nana Patole गुरुवारी इंदपूरमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना पटोले यांनी केलेल्या एका विधानामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांना धोक्याची घंटा असल्याचे मानले जात आहे. इंदापूर मतदारसंघात राष्ट्रवादीचा आमदार असला तरी या मतदार संघात पुढच्या वेळी काँग्रेसचा आमदार असेल, असा दावा नाना पटोले यांनी केला आहे. इंदापूरची जागा काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी महत्त्वाची असते. त्यातच नाना पटोले Nana Patole यांनी केलेल्या विधानामुळे पुढच्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीच्या गडावरच हल्ला चढवणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांना पुन्हा डिवचलं, म्हणाले -‘ चंद्रकांत पाटलांनी कधी शेती केली का ?’

काय म्हणाले नाना पटोले ?
इंदापूर तालुक्यामध्ये काँग्रेसला मानणारा वर्ग मोठा आहे. गावागावांमध्ये लोक काँग्रेसला मानतात. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत इंदापूरमध्ये काँग्रेसचा आमदार असेल. तसेच जे कोणी काँग्रेसला मानणारे आहेत त्यांच्यासाठी पक्षात जागा खाली आहे. पण संधी साधूंसाठी काँग्रेस पक्षात जागा नाही. ज्यांना एक पक्ष म्हणून काम करायचे असेल त्यांच्यासाठी काँग्रेसची दारं उघडी आहेत. पण सत्तेसाठी नाही. 2024 च्या निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असेल असा दावा नाना पटोले Nana Patole यांनी केला आहे.

Pandharpur : गोपिचंद पडळकरांचा शरद पवारांवर पुन्हा घणाघात, म्हणाले…

इंदापूरमध्ये काँग्रेसचे आमदार हर्षवर्धन पाटील यांनी 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. हर्षवर्धन पाटील हे इंदापूरचे नेतृत्व करत असताना 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ही जागा राष्ट्रवादीला सोडल्याने नाराज झालेल्या हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. मागील दोन निवडणुकांमध्ये हर्षवर्धन पाटील यांच्या गडाला सरुंग लावण्याचे काम दत्तात्रय भरणे यांनी केले. भरणे हे अजित पवारांचे अत्यंत विश्वासू आहेत. भरणे यांनी 2014 व 2019 मध्ये हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला होता. आता नाना पटोले Nana Patole यांनी केलेल्या विधानामुळे दत्तात्रय भरणे आणि अजित पवार यांचे टेन्शन वाढले आहे.

Also Read :

Rohit Pawar : ‘राज्यातील निर्बंधांचा अनेकांना त्रास होऊ शकतो, पण…’

 

स्मृती इराणींचा ममता बॅनर्जीवर हल्लाबोल, म्हणाल्या – ‘कोरोनासाठी मोदी-शहांना जबाबदार धरणे यातून ममतांचे संस्कार दिसतात’


Coronavirus in India : ‘कोरोना’ने सर्वच रेकॉर्ड मोडले ! गेल्या 24 तासांत 2 लाखांहून अधिक रुग्ण, सलग दुसऱ्या दिवशी 1 हजाराहून जास्त रुग्णांचा मृत्यू

 

अजित पवारांचा फडणवीसांना सणसणीत टोला, म्हणाले -‘आपला नाद कुणी करायचा नाही, सरकार पाडणं हे कोणा येरा गबाळ्याचं काम नाही’

100 कोटींचे खंडणी प्रकरण : CBI कडून माजी ग्रहमंत्री अनिल देशमुखांची साडेआठ तास चौकशी

 

चंद्राकांत पाटलांचा दावा, म्हणाले- ‘पुढील महिन्यात ‘या’ तारखेला राज्यातील सत्तेला नक्कीच सुरुंग’

Related Posts