IMPIMP

PM Modi | PMO च्या ‘कानपिचक्या’ आणि पुण्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंदिर झाले ‘बंद’ !

by nagesh
PM Modi | temple of pm narendra modi closed in aundh

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  PM Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे औंध येथे मंदिर उभारण्यात येऊन त्याचे स्वातंत्र्य दिनी लोकार्पण करण्यात आले होते. याची बातमी थेट दिल्लीत पोहचली. पीएमओकडून या बाबत नाराजी व्यक्त करताच शहर भाजपचे पदाधिकारी खडबडुन जागे झाले आणि अखेर हे मंदिर बंद करण्यात आले.  पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांचा या मंदिरातील पुतळा येथील भाजपच्या नगरसेवकाच्या कार्यालयात हलविण्यात आला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज येथे आंदोलन करण्यात येणार होते. पीएमओ ऑफिसमधून करण्यात आलेली कानउघडणी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन यामुळे भाजप पदाधिकार्‍यांनी तातडीने हालचाल करुन हे मंदिर बंद केले आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

एका कार्यकर्त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बदनामी होत असल्याने हे मंदिर बंद करण्यात आल्याचे पदाधिकार्‍यांकडून सांगण्यात आले. भाजपचे कार्यकर्ते मयुर मुंडे (BJP activist Mayur Munde) यांनी औंध गाव (Aundh) येथे नगरसेविका अर्चना मुसळे (Corporator Archana Musle) यांच्या कार्यालयाजवळ 15 ऑगस्ट रोजी या मंदिराचा लोकार्पण सोहळा साजरा करण्यात आला होता. देशातील नरेंद्र मोदी यांचे हे पहिलेच मंदिर असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यासाठी १ लाख ६० हजार रुपये खर्च करुन खास जयपूर येथून मोदी यांचा मार्बलचा पुतळा तयार करुन घेण्यात आला होता. हे मंदिर उभारल्याची चर्चा संपूर्ण देशात पसरली. पंतप्रधान कार्यालयाने याची गंभीर दखल घेतली.

दिल्लीतून थेट शहर भाजपा पदाधिकायांची कानउघडणी करण्यात आली.  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही पदाधिकार्‍यांना सुचना केल्या. त्यानंतर शहर भाजपा पदाधिकार्‍यांची धावपळ उडाली. मंदिर बांधणारे भाजपाचे कार्यकर्ते मयुर मुंडे (BJP activist Mayur Munde) यांना मंदिर हटविण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर त्यांनी स्वत:  मोदी यांचा पुतळा काढून जवळच असलेल्या नगरसेविकेच्या कार्यालयात हलविला. त्यानंतर मंदिर पडदा टाकून बंद केले आहे.

 

Web Title : PM Modi | temple of pm narendra modi closed in aundh

 

हे देखील वाचा :

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 172 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | मोक्कामध्ये फरार असलेल्या गायकवाड बाप-लेकावर पुणे पोलिसांची मोठी कारवाई, आवळल्या मुसक्या

NDA Exam for Women | आता महिला सुद्धा देऊ शकतात एनडीएची परीक्षा, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

Pune Crime | पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने सपासप वार, 3 जणांवर FIR

Anti Corruption Pimpri Chinchwad | 9 लाखाचे लाचेचे प्रकरण ! पिंपरी-चिंचवड मनपाचे स्थायी समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन लांडगे अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

 

Related Posts