IMPIMP

पूजा चव्हाण, मनसुख हिरेन प्रकरणातील शवविच्छेदन अहवालात छेडछाड? ‘या’ भाजप नेत्याची टीका

by bali123
BJP On Shivsena | mumbai bjp president ashish shelar criticism of shivsena uddhav thackeray

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Ashish Shelar | सध्या राज्यात मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण आणि पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण खूप गाजत आहे. या दोन प्रकरणांमुळे राज्यतील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. त्यातच आता पूजा चव्हाण प्रकरणातील ज्या ऑडिओ क्लिप सांताक्रुज येथील फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आल्यात त्यामध्ये छेडछाड करण्यात येते की काय? तसेच मनसुख हिरेन यांचे शवविच्छेदन अहवालात ही छेडछाड केली जाण्याची शक्यता लक्षात घेऊन तातडीने या पुराव्यांची स्वतंत्र यंत्रणेमार्फत तपासणी करण्याची मागणी भाजप नेते आमदार आशिष शेलार Ashish Shelar यांच्याकडून करण्यात आली आहे.

काय म्हणाले आशिष शेलार Ashish Shelar

सध्या ठाकरे सरकारची हेराफेरी सुरु आहे. या सरकारच्या काळात रोज नवीन हेराफेरी पाहायला मिळत आहे. एक गुन्हा लपवण्यासाठी दुसरा गुन्हा केला जात आहे. पूजा चव्हाणप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांचा राजिनामा घेण्यात आला. त्यानंतर लगेच सचिन वाझे प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणाचा फायदा घेत राठोड प्रकरणातील ऑडिओ क्लीप ज्या सांताक्रूझ येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये छेडछाड सुरु आहे की काय? त्या ऑडिओ क्लीप मधला आवाज संजय राठोड यांचा नाहीच असे अहवाल तयार होण्यासाठी पोलीस यंत्रणेमार्फत छेडछाड होण्याची शक्यता आहे.

तसेच मनसुख हिरेन यांचा शवविच्छेदन अहवाल तसे शवविच्छेदन करतानाचे रेकोर्डिंग पोलीसांना पुर्णपणे देण्यात आलेले नाही.
त्यामध्येसुद्धा छेडछाड केली जाते आहे की काय ? अशी शंका निर्माण होत आहे.
त्यामुळे या सर्व प्रकरणाशी संबंधीत पुराव्यांची स्वतंत्र यंत्रणेमार्फत तपासणी होण्याची गरज आहे असे आमदार आशिष शेलार यांनी म्हटले आहे.
दरम्यान, एका पोलीस अधिकाऱ्याच्या गाडीत सापडलेल्या नोटा तसेच पैसे मोजण्याचे मशीन हाच का तो
आघाडी सरकारचा “किमान समान कार्यक्रम” आहे का?
असा टोला देखील आशिष शेलार यांनी लगावला आहे.

अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं ठेवल्यानं सरकार किंवा शिवसेनेला काय लाभ होईल? निवृत्त पोलिस म्हणाले…

शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! पगारात होणार मोठ्या प्रमाणात वाढ

पंढरपूरची पोटनिवडणूक जाहीर ! 17 एप्रिलला होणार मतदान, राष्ट्रवादीकडून कोणाला संधी?

Sanjay Raut : ‘वाझे प्रकरणामुळं सरकार अस्थिर झालं यात तथ्य नाही, सरकार पडणं शक्य नाही’

56 % कोरोना लसी वापराविना पडून; केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले…

Related Posts