IMPIMP

राजेंद्र शिंगणेंना आता 100 कोटीचं टारगेट दिले, गोपीचंद पडळकरांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

by nagesh
Rajendra Shingane has now been given a target of Rs 100 crore, Gopichand Padalkar attacks Thackeray government

मुंबई/गोंदिया : सरकारसत्ता ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर आरोप कल्यानंतर भाजप नेते आक्रमक झाले आहेत. नवाब मलिक हे स्वत:चं पाप झाकण्यासाठी भाजपवर बेछूट आरोप करत असल्याचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी म्हटले आहे. नवाब मलिक पालकमंत्री असलेल्या गोंदिया जिल्ह्यात काल ऑक्सिनअभावी 15 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आपल्या कामचुकारपणावर पांघरुण घालण्यासाठी ते भाजपवर असे आरोप करत आहेत. संकटाच्यावेळी रुग्णांच्या कुटुंबाना मदत करण्याऐवजी ते आपली राजकीय पोळी भाजत आहेत. ‘नवाबभाई ये पब्लिक है सब जानती है…’ असेही पडळकर यांनी म्हटले.

काँग्रेसच्या नेत्यानं विचारला फडणवीस अन् दरेकरांना सवाल, म्हणाले – ‘पोलीस एखाद्याला चौकशीसाठी बोलावू शकत नाहीत का?’

पडळकर Gopichand Padalkar यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावर निशाणा साधताना म्हटले की, या गंभीर प्रकरणाची दखल घेण्याऐवजी आरोग्यमंत्र्यांनी बघ्याची भूमिका घेऊन हात झटकले. ऑक्सिजन अभावी राज्यात एकपण मृत्यू झाला नाही असे वक्तव्य केले. ही कोणती संवेदनशीलता ? असा प्रश्न उपस्थित करत पडळकर म्हणाले, मागील दीड वर्षात फ्रंटलाईनवर अथक परिश्रम घेणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांशी व डॉक्टरांशी सरकारला साधा संवाध ही करावासा वाटला नाही. कालच मला समजले की कर्मचारी आणि डॉक्टर संपावर जाण्याच्या तयारीत आहे.

Nawab Malik : फार्मा कंपनीच्या मालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यावर संपूर्ण भाजप का घाबरली? फडणवीसांनी वकीलपत्र घेतलं का?

सरकारला सर्व गोष्टी जनतेकडून अपेक्षित आहेत. पण सरकार म्हणून कसला ही अॅक्शन प्लान तयार नाही. या सरकारने बेशरमपणाचा कळस गाठला आहे, अशा शब्दात पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. सध्या महाराष्ट्रात रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा आहे. अशा संकट काळात जे उद्योजक इंजेक्शनचा पुरवठा करण्यासाठी पुढे येत आहेत, त्यांनाच चौकशीला बोलावून पोलिसांच्या बळाचा वापर केला जात आहे. यातून आपला काय हेतू आहे ? हे दिसतंय. आता असे वाटू लागले आहे की, राजेंद्र शिंगनेंना आता शंभर कोटीचं टारगेट दिले आहे. त्यामुळेच तर हे सरकारी यंत्रणाचा गैरवापर करत आहेत का ? असा टोला गोपीचंद पडळकर Gopichand Padalkar यांनी लगावला.

Also Read :

भोर पंचायत समिती सभापती निवडणुकीत बंडखोरी केल्याने राष्ट्रवादीतून 2 सदस्यांची हकालपट्टी !

ठाकरे सरकारच्या ‘शिवभोजन थाळी’वर भाजपचा गंभीर आरोप; ‘योजना फक्त दिखाऊ’

एका ओळीचे पत्र लिहून जिल्हाधिकाऱ्यांनी उदयनराजेंना 450 रुपये केले परत

Pandharpur : गोपिचंद पडळकरांचा शरद पवारांवर पुन्हा घणाघात, म्हणाले…

पंढरपूर-मंगळवेढ्यात प्रचाराच्या तोफा थंडावल्या ! अखेरच्या दिवशी भाजपची एकही प्रचारसभा नाही, उद्या मतदान

अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांना पुन्हा डिवचलं, म्हणाले -‘ चंद्रकांत पाटलांनी कधी शेती केली का ?’

Rohit Pawar : ‘राज्यातील निर्बंधांचा अनेकांना त्रास होऊ शकतो, पण…’

Related Posts