IMPIMP

Rajya Sabha Election 2022 | राज्यसभेच्या 6 व्या जागेसाठी उमेदवार ठरला ! संजय पवारांच्या नावावर शिवसेनेचं शिक्कामोर्तब ?; जाणून घ्या सेनेच्या जिल्हा प्रमुखाबाबत

by nagesh
Rajya Sabha Election 2022 | rajya sabha election 2022 shivsena nominates sanjay pawar from kolhapur for rajya sabha nomination

मुंबई : सरकारसत्ता  ऑनलाइन – Rajya Sabha Election 2022 | राज्यसभेच्या निवडणुकीवरुन (Rajya Sabha Election 2022) राज्यात राजकीय वातावरण तंग झालं आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी कोण ? या सवालावरुन अनेक तर्क लढवले जात आहेत. एकीकडे संभाजीराजे छत्रपतींना (Sambhajiraje Chhatrapati) शिवबंधन बांधण्यास सांगितलं होतं. परंतु प्रत्यक्ष तसे संभाजीराजे कडून उत्तर मिळाले नसून आता सहाव्या जागेवर शिवसेनेने (Shivsena) कोल्हापुरातील शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार (Sanjay Pawar) यांच्या नावासमोर शिक्कामोर्तब केला आहे. लवकरच त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

सहाव्या जागेसाठी कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नावाची वर्णी लागल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. अजुन पक्षाकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, शिवसेनेकडून राज्यसभेसाठी संभाजीराजे छत्रपतींसोबतच चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) आणि संजय पवार यांच्या नावाची चर्चा होती. संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेची पक्षप्रवेशाची ऑफर नाकारली. त्यामुळे शिवसेना उमेदवार देणार हे स्पष्ट झालं होतं. या उमेदवारीसाठी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे आणि संजय पवार यांची नावं आघाडीवर असल्याची माहिती होती. त्यानंतर संजय पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

संभाजीराजेंची पुढची भूमिका काय ?
शिवसेनेकडून देण्यात आलेल्या पक्ष प्रवेशाच्या निमंत्रणाकडे संभाजीराजे (Sambhajiraje) यांनी पाठ फिरवली आहे.
त्यामुळे संभाजीराजेंची पुढची भूमिका काय असेल ? याकडे लक्ष लागले आहे.
या दरम्यान, शिवसेनेच्या एका बड्या नेत्यासोबत मराठा क्रांती मोर्चाच्या प्रमुख समन्वयकांची आज बैठक पार पडणार आहे.
त्यामुळे संभाजीराजे काय भूमिका घेणार ? हे पाहणं महत्त्वाचे असणार आहे.

Web Title :- Rajya Sabha Election 2022 | rajya sabha election 2022 shivsena nominates sanjay pawar from kolhapur for rajya sabha nomination

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

हे देखील वाचा :

Pune ATS | पुण्यातील युवकाला काश्मीरमधील दहशतवादी संघटनेकडून फंडिंग ?; पुणे एटीएसकडून अटक

Home Remedies For Throat Problem | घशासंबंधी आजारांसाठी करा ‘हे’ 4 घरगुती उपाय; जाणून घ्या

Ajit Pawar Slams Officers In Satara | अजित पवारांनी काढली अधिकाऱ्यांची खरडपट्टी; म्हणाले – ‘कुठं फेडाल ही पापं ?, कामं तरी चांगली करत चला’

Related Posts