IMPIMP

संचारबंदीदरम्यान आमदार महोदयांच्या नातेवाईकाची अडवली गाडी अन् मग…

by Team Deccan Express
relatives vehicle blocked during curfew bjp mla prashant bamb had argument police

औरंगाबाद : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्यात कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामध्ये संचारबंदीही curfew लागू करण्यात आली आहे. यादरम्यान विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. त्यातच आता औरंगाबादमधील भाजपचे आमदार प्रशांत बंब यांच्या नातेवाईकाची गाडी अडवली होती. त्यावर संतापलेल्या आमदार बंब आणि पोलिसांमध्ये वाद झाला.

‘ब्रेक दी चेन’ या अंतर्गत राज्यात अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. कलम 144 लागू करण्यात आला आहे. त्यानुसार, शहरात विनाकारण फिरण्यास बंदी curfew घालण्यात आली आहे. शहरात विविध ठिकाणी पोलिसांकडून नाकाबंदी करून कारवाई केली जात आहे. औरंगाबाद शहरात शुक्रवारी महात्मा फुले चौकात एका तरुणाला अडवले. त्यावर या तरुणाने कोरोना रुग्ण असलेल्या नातेवाईकाला काही वस्तू देण्यासाठी जात असल्याचे सांगितले. मात्र, पोलिसांना त्याच्यावर संशय आला. पोलिसांनी त्याची आणखी विचारपूस केली आणि त्यानंतर त्याच्यावर कारवाई केली. या प्रकारानंतर त्याने आमदार बंब यांना फोन केला आणि त्यांना बोलावून घेतले.

या तरुणाने फोन केल्यानंतर प्रशांत बंब त्याठिकाणी आले आणि त्यांनी पोलिसांना जाब विचारत वाद घातला. हा तरुण हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णाला भेटायला जात होता, त्याला का अडवले असा सवाल प्रशांत बंब यांनी केला. अशाप्रकारे पोलिस लोकांना अडवू शकत नाही, असेही बंब म्हणाले. मात्र, तरुणावर संशय आल्याने कारवाई केल्याचे पोलिसांनी स्पष्टपणे सांगितले.

Also Read :

Pandharpur : गोपिचंद पडळकरांचा शरद पवारांवर पुन्हा घणाघात, म्हणाले…

पंढरपूर-मंगळवेढ्यात प्रचाराच्या तोफा थंडावल्या ! अखेरच्या दिवशी भाजपची एकही प्रचारसभा नाही, उद्या मतदान

अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांना पुन्हा डिवचलं, म्हणाले -‘ चंद्रकांत पाटलांनी कधी शेती केली का ?’

 

Rohit Pawar : ‘राज्यातील निर्बंधांचा अनेकांना त्रास होऊ शकतो, पण…’

 

स्मृती इराणींचा ममता बॅनर्जीवर हल्लाबोल, म्हणाल्या – ‘कोरोनासाठी मोदी-शहांना जबाबदार धरणे यातून ममतांचे संस्कार दिसतात’


Coronavirus in India : ‘कोरोना’ने सर्वच रेकॉर्ड मोडले ! गेल्या 24 तासांत 2 लाखांहून अधिक रुग्ण, सलग दुसऱ्या दिवशी 1 हजाराहून जास्त रुग्णांचा मृत्यू

 

अजित पवारांचा फडणवीसांना सणसणीत टोला, म्हणाले -‘आपला नाद कुणी करायचा नाही, सरकार पाडणं हे कोणा येरा गबाळ्याचं काम नाही’

100 कोटींचे खंडणी प्रकरण : CBI कडून माजी ग्रहमंत्री अनिल देशमुखांची साडेआठ तास चौकशी

 

चंद्राकांत पाटलांचा दावा, म्हणाले- ‘पुढील महिन्यात ‘या’ तारखेला राज्यातील सत्तेला नक्कीच सुरुंग’

Related Posts