IMPIMP

Video : 48 तास उलटले, कुठंय ‘त्या’ 16 कंपन्यांची यादी? खोटं बोलून स्टंटबाजी करणं थांबवा – किरीट सोमय्या

by nagesh
Kirit Somaiya | BJP Leader On Thackeray Government Minister Nawab Malik Arrest ED

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्यात कोरोना परिस्थिती बिघडत आहे. त्यातच रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या मुद्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीका केली जात आहे. त्यानंतर आता भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना टोला लगावत म्हटले, की ’48 तास उलटले, कुठंय ‘त्या’ 16 कंपन्यांची यादी?’

काँग्रेसच्या नेत्यानं विचारला फडणवीस अन् दरेकरांना सवाल, म्हणाले – ‘पोलीस एखाद्याला चौकशीसाठी बोलावू शकत नाहीत का?’

महाराष्ट्राला रेमडेसिव्हिर इंजेक्शन पुरवाल तर कंपन्यांचा परवाना रद्द करू अशी धमकी केंद्र सरकारने 16 कंपन्यांना दिल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला होता. त्यावरून किरीट सोमय्या kirit somaiya यांनी निशाणा साधला. ते म्हणाले, ‘महाराष्ट्राला रेमडेसिव्हिर इंजेक्शन देऊ नका असा आदेश केंद्र सरकारने दिल्याचा आरोप ठाकरे सरकारचे मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. 48 तास झाले कुठे आहे त्या 16 कंपन्यांची यादी? कुठे आहे मोदी सरकारने प्रतिबंध केलेले पत्र? खोटे बोलणे आणि स्टंटबाजी करणे थांबवा. लोकांना ऑक्सिजन, बेड्स मिळत नाहीत काहीतरी काम करा’.

Nawab Malik : फार्मा कंपनीच्या मालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यावर संपूर्ण भाजप का घाबरली? फडणवीसांनी वकीलपत्र घेतलं का?

दरम्यान, केंद्र सरकारकडून रेमडेसिव्हिर निर्यातीवर बंदी घातली गेल्याने भारतातील 16 निर्यातदारांना स्वतःकडे असलेल्या 20 लाख रेमडेसिव्हिरच्या कुपी विकायला परवानगी मिळत नाही. मात्र, हे उत्पादन करणार्‍या 7 कंपन्यांमार्फतच रेमडेसिव्हिर विकले जावे असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. मात्र या 7 कंपन्या जबाबदारी घेण्यास नकार देत असल्याने आता केंद्र सरकार पुढे निर्णय घेण्याचा पेच निर्माण झाला आहे, असे नवाब मलिक यांनी म्हटले होते.

Also Read :

स्मृती इराणींचा ममता बॅनर्जीवर हल्लाबोल, म्हणाल्या – ‘कोरोनासाठी मोदी-शहांना जबाबदार धरणे यातून ममतांचे संस्कार दिसतात’

एका ओळीचे पत्र लिहून जिल्हाधिकाऱ्यांनी उदयनराजेंना 450 रुपये केले परत

अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांना पुन्हा डिवचलं, म्हणाले -‘ चंद्रकांत पाटलांनी कधी शेती केली का ?’

भोर पंचायत समिती सभापती निवडणुकीत बंडखोरी केल्याने राष्ट्रवादीतून 2 सदस्यांची हकालपट्टी !

Related Posts