IMPIMP

खा. संजय राऊतांचा सरकारला सल्ला, म्हणाले -‘सरकारमधील प्रत्येक घटकानं आत्मपरीक्षण करावं’

by bali123
sanjay raut reaction on parambir singh letter to cm uddhav thackeray

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – एन्काऊंटर स्पेशालिस्ट आणि अँटिलिया स्फोटक प्रकरणातील आरोपी सचिन वाझे यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दरमहा 100 कोटी रुपये मुंबईतून वसूल करण्यास सांगितले होते, असा खळबळजनक गौप्यस्फोट मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला आहे. या सर्व घडामोडीनंतर शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत sanjay raut यांनी प्रत्येकाने नक्कीच आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. अशा प्रकारचे आरोप होत आहेत हे दुर्दैवी असल्याचे राऊत यांनी म्हटलं आहे. ते नाशिकमध्ये बोलत होते.

पंढरपूरचा उमेदवार शरद पवार ठरवतील

राज्य सरकारवर शिंतोडे उडाले
परमीबर सिंग यांनी मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांना लिहिलेल्या पत्रात अनेक गंभीर आरोप केले आहेत. या लेटरबॉम्बनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आणि महाराष्ट्र पोलीस दलात मोठा भूकंप झाला आहे. या सर्व घटनेनंतर संजय राऊत यांनी राज्य सरकारवर शिंतोडे उडाले आहेत आणि सरकारमधील मंत्र्यांनी आपले पाय जमिनीवर आहेत का, ते तपासून पाहायला हवे, असे सूचक विधान खासदार संजय राऊत sanjay raut यांनी केले आहे.

‘तलाश नए रास्तों की है…’ खा. संजय राऊतांच्या ट्विटने राजकीय वर्तुळात खळबळ

हितचिंतकांसाठी हे धक्कादायक
संजय राऊत sanjay raut म्हणाले, परमबीर सिंग यांच्या पत्राचा महाराष्ट्रात नक्कीच चर्चेचा विषय आहे. सनसनाटी आणि खळबळजनक पत्र आहे. लोक म्हणतात हा लेटर बॉम्ब मात्र यात सत्यता किती आहे हे मुख्यमंत्री आणि शरद पवार तपासून पाहतील. या प्रकरणी स्वत: अनिल देशमुख यांनी पत्राच्या चौकशीची मागणी केली आहे. मात्र, प्रत्येकाने नक्कीच आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. अशा प्रकराचे आरोप होणे हे दुर्दैवी आहे. ज्यांनी हे सरकार यावं म्हणून खारीचा वाटा उचलला अशा आमच्या हितचिंतकांसाठी हे धक्कादायक असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.

तपासावरून लक्ष विचलित करण्यासाठी परमबीर सिंग यांचे पत्र – जयंत पाटील


सत्तेपुढे शहाणपण नसतं
विरोधी पक्षाने मागणी केली म्हणून सरकार चालत नाही. 72 तास सरकारवर शिंतोडे उडाले हे मान्य करण्याचा मोठेपणा माझ्याकडे आहे. यातून कस धुवून काढायचं यासंदर्भात एकत्र बसून निर्णय घेतला जाईल. मुख्यमंत्र्यांनी सरकारची प्रतिमा चांगली ठेवण्याचा कसोशीने प्रयत्न केला. काही गोष्टींवर योग्य वेळी निर्णय घेणे अपेक्षित होतं, पण सत्तेपुढे शहाणपण नसतं, असंही संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा
परमबीर सिंहांच्या पत्रामुळं गृहमंत्र्यांवर राजीनाम्याचा दबाव? शरद पवारांनी अजितदादांसह ‘या’ दिग्गज मंत्र्याला बोलावलं दिल्लीत

Sanjay Raut : ‘पहाटेचा शपथविधी घोडेबाजार नाही तर काय गाढवबाजार होता का ?’

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंहांच्या ‘त्या’ पत्रामुळे भाजप आक्रमक, गृहमंत्र्यांचा राजीनामा?

मुलीला वडिलांच्या दुसऱ्या लग्नाबाबत सवाल उपस्थित करण्याचा अधिकार, मुंबई HC चा महत्वपूर्ण निकाल

Obesity Causes : ‘या’ 7 गोष्टीमुळं लठ्ठपणाचे शिकार होतात लोक, जाणून घ्या

Related Posts