IMPIMP

परमबीर सिंहांच्या पत्रामुळं गृहमंत्र्यांवर राजीनाम्याचा दबाव? शरद पवारांनी अजितदादांसह ‘या’ दिग्गज मंत्र्याला बोलावलं दिल्लीत

by bali123
parambir singh letter controversy sharad-pawar calls ajit pawar and jayant patil meeting in delhi

नवी दिल्ली : सरकारसत्ता ऑनलाइन – मुंबई आयुक्त पदावरून उचलबांगडी करण्यात आलेले परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. गृहमंत्र्यांनी महिन्याला १०० कोटी रुपये गोळा करण्यास सचिन वाझेंना सांगितले होते तसे पूर्वे आपल्याकडे असल्याचे सिंग यांनी म्हटले आहे. सिंग यांच्या आरोपानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. विरोधकांनी या प्रकारावरून सरकारला धरेवर धरलं असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ही अतिशय धक्कादायक आणि दुर्दैवी घटना असल्याचं म्हटले आहे, तर दुसरीकडे अनिल देशमुख यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. मात्र देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. आता या प्रकरणी दिल्लीत खलबतं सुरू आहे. राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार sharad pawar दिल्लीत असून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना दिल्लीत बैठकीसाठी आमंत्रण देण्यात आलंय. या बैठकीला संजय राऊत हे देखील उपस्थित राहणार असल्याचे समजते.

तपासावरून लक्ष विचलित करण्यासाठी परमबीर सिंग यांचे पत्र – जयंत पाटील

परमबीर सिंग यांनी त्यांच्या पत्रात राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार sharad pawar यांना या सगळ्याची कल्पना होती, असं म्हटले आहे. या पत्रामुळे विरोधक चांगलेच आक्रमक झाले असून भाजपनं गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तत्पूर्वी दोन दिवसांपूर्वीच दिल्लीत जाऊन शरद पवार यांची अनिल देशमुख यांनी भेट घेतली होती. त्यानंतर देशमुख म्हणाले की, एक मोठा आंतरराष्ट्रीय उद्योगसमूह विदर्भामध्ये मिहान प्रकल्पामध्ये येण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी काही अडचणी आहेत, त्या सोडवण्यासाठी केंद्र स्तरावर शरद पवारांनी प्रयत्न करावेत, त्यासाठी या संदर्भात माहिती देण्यासाठी शरद पवारांची भेट घेतली. असे त्यांनी सांगितले होते त्याचबरोबर मुंबईच्या घडामोडीवरही चर्चा झाल्याचं देशमुख यांनी सांगितलं होत.

Sanjay Raut : ‘पहाटेचा शपथविधी घोडेबाजार नाही तर काय गाढवबाजार होता का ?’

दरम्यान एक सोहळ्यात बोलताना मी राजीनामा शरद पवार सांगतील त्यावेळी देईन असे देशमुख यांनी स्पष्ट केले होते. या सर्व घडामोडींनंतर आज सायंकाळी दिल्लीत अजित पवार, जयंत पाटील हे भेट घेणार आहेत, त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तत्पूर्वी हे दोन्ही नेते आज सकाळी पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून उमेदवाराचं नाव निश्चित करणार आहे. त्यानंतर ते दिल्लीला रवाना होणार आहेत.

राजीनाम्याच्या मागणीवरून ठाकरे सरकारवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सडकून टीका केली आहे. फडणवीस म्हणाले की, पोलीस दलात काही दिवसापासून अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. नुकतेच परमबीर सिंग यांनी केलेले आरोप धक्कादायक आहेत. डीजी दर्जाच्या अधिकाऱ्याने केलेले इतक्या गंभीर स्वरुपाचे आरोपांमुळे पोलिसांचं मनोधैर्य खच्ची होत आहे. ही घटना म्हणजे या प्रकरणातला कळस आहे, असं फडणवीस म्हणाले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करत अमृता फडणवीस यांनीही ट्विट केलंय. त्यानंतर भाजपने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. दरम्यान यासंदर्भात शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं होतं.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंहांच्या ‘त्या’ पत्रामुळे भाजप आक्रमक, गृहमंत्र्यांचा राजीनामा?

संजय निरुपम यांची पवारांवर टीका
शरद पवारांवर काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी थेट हल्लाबोल केला आहे. शरद पवार हे महाराष्ट्राचे शिल्पकार आहेत, त्यामुळे परमबीर सिंग यांच्या आरोपांमध्ये तथ्य असल्यास, त्यांचे दावे खरे असल्यास आदरणीय शरद पवारजींना जाब विचारायला हवा. तथाकथित तिसरी आघाडी हेच करणार आहे का?’, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तर या विषयात काँग्रेसनं ठाम भूमिका घ्यायला हवी, अशी अपेक्षादेखील त्यांनी व्यक्त केली आहे.

संजय राऊत म्हणतात… सरकार अडचणीत
परमबीर सिंग यांनी केलेले आरोप धक्कादायक आहेत, अशा प्रकारचे गंभीर आरोप होणं मंत्र्यांसाठी, सरकारसाठी दुर्दैवी असून अनिल देशमुख याच्यावरील आरोपामुळे ठाकरे सरकारदेखील अडचणीत सापडलं आहे. असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबईत म्हंटल आहे. एकूणच त्यांच्या प्रतिक्रियेवरून राऊत यांना देखील सरकारचा बचाव करणं अवघड होत असल्याचं दिसत आहे.

हेही वाचा

मुलीला वडिलांच्या दुसऱ्या लग्नाबाबत सवाल उपस्थित करण्याचा अधिकार, मुंबई HC चा महत्वपूर्ण निकाल

Obesity Causes : ‘या’ 7 गोष्टीमुळं लठ्ठपणाचे शिकार होतात लोक, जाणून घ्या

Related Posts