IMPIMP

‘तलाश नए रास्तों की है…’ खा. संजय राऊतांच्या ट्विटने राजकीय वर्तुळात खळबळ

by bali123
congress should think about its performance gujarat municipal election says shiv sena mp sanjay raut

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत sanjay raut हे शिवसेनेचे मुखपत्र सामानातील लेख, अग्रलेख, पत्रकार परिषद आणि मुलाखतीमधून पक्षाची भूमिका सातत्याने मांडत असतात. याशिवाय ते फेसबुक आणि ट्विटरवर देखील अनेक वेगवेगळ्या पोस्ट करत असतात. व्यंगचित्र आणि शेरोशायरीतून ते विरोधकांवर नेहमीच टोलेबाजी करीत असतात. आजही त्यांनी असाच एक शेर ट्विटरवर पोस्ट केला आहे. त्यांचा रोख नेमका कोणाकडे आहे, यावरुन राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

तपासावरून लक्ष विचलित करण्यासाठी परमबीर सिंग यांचे पत्र – जयंत पाटील

एन्काऊंटर स्पेशालिस्ट आणि अँटिलिया स्फोटक प्रकरणातील आरोपी सचिन वाझे यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दरमहा 100 कोटी रुपये मुंबईतून वसूल करण्यास सांगितले होते, असा खळबळजनक गौप्यस्फोट मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला आहे. यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात वादळ आल्याचे चित्र पहायला मिळत आहे. भाजपने या मुद्यावरुन सरकारला घेरलं आहे. विरोधकांकडून हा विषय उचलून धरला असताना खासदार संजय राऊत sanjay raut यांनी या विषयावर बोलणं टाळलं आहे. मात्र, त्यांनी केलेले ट्विट चर्चेचा विषय बनला आहे.

परमबीर सिंहांच्या पत्रामुळं गृहमंत्र्यांवर राजीनाम्याचा दबाव? शरद पवारांनी अजितदादांसह ‘या’ दिग्गज मंत्र्याला बोलावलं दिल्लीत

संजय राऊत यांनी जावेद अख्तर यांचा एक शेर ट्विट केला आहे. संजय राऊत sanjay raut यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, हमको तो तलाश बस नए रास्तों की है… हम है मुसाफिर ऐसे जो मंजिल से आए है…, संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटचा नेमका अर्थ काय ? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. संजय राऊत काहीवेळा आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी अशा प्रकारचे शेर ट्विट करत असतात. मात्र आज त्यांनी केलेल्या ट्विटचा रोख नेमका कोणाकडे आहे. हे समजू शकले नाही. यावर त्यांना विचारले असता त्यांनी लवकरच समजेल असे म्हटले आहे.

हेही वाचा
Sanjay Raut : ‘पहाटेचा शपथविधी घोडेबाजार नाही तर काय गाढवबाजार होता का ?’

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंहांच्या ‘त्या’ पत्रामुळे भाजप आक्रमक, गृहमंत्र्यांचा राजीनामा?

मुलीला वडिलांच्या दुसऱ्या लग्नाबाबत सवाल उपस्थित करण्याचा अधिकार, मुंबई HC चा महत्वपूर्ण निकाल

Obesity Causes : ‘या’ 7 गोष्टीमुळं लठ्ठपणाचे शिकार होतात लोक, जाणून घ्या

Related Posts